नाशिक प्रतिनिधी : भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ चांगल्याच आक्रमक झाल्या असून राज्यातील (Maharashtra) कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे ढासळली आहे गुंडांसाठी महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकार काम करत आहे असा घणाघाती आरोप वाघ यांनी केला आहे. राज्यात दिवसाढवळ्या महिलांची छेड काढली जात आहे, त्यांना न्याय मिळत नाही. अशी विचित्र परिस्थिती निर्माण झाली असून महिलांना गुंडांच्या धाकातच फिरावे लागत आहे, असा सनसनाटी आरोप वाघ यांनी केला.
नाशिक जिल्ह्यातील येवला येथे भोंदूबाबाच्या अत्याचाराला बळी पडलेल्या कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर चित्रा वाघ चांगल्याच संतापल्या होत्या. नाशिकमध्ये भाजपच्या वसंत-स्मृती कार्यालयात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधत सरकारवर ताशेरे ओढले आहेत. वाघ पुढे म्हणाल्या येवला तालुक्यात भोंदूबाबाकडून महिलांचे शोषण होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर काही महिलांकडे विचारणा केली. पोलिस यंत्रणेकडून सुरू असलेल्या तपासाचीही माहिती घेतली. पोलिस तपास योग्य सुरू असल्याची सकारात्मक बाब आहे. असल्या भोंदूबाबाच्या आमिषाला अंधश्रद्धेला महिलांनी बळी पडू नये, या संदर्भात अजून किती महिला बळी पडल्या याचाही तपास करावा. असे आवाहन देखील वाघ यांनी केले आहे.
राज्यात सर्रासपणे अत्याचार होताय गुंड मोकाट फिरत असून त्यांना कायद्याचे भय अजिबात नाही , पोलिसांचा धाकही नाही. त्याला गोरगरीब जनता बळी पडते. महिलांनीदेखील ताकदीने समोर यावे. नाशिक सुसंस्कृत शहर म्हणून बघितले जायचे मात्र नाशिक बरोबरच राज्यात संपूर्ण कायदा व सुव्यवस्था विस्कळीत असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला. पुण्यातील भारतीय कामगार सेनेचा पदाधिकारी रघुनाथ कुचिक याचा उल्लेख करताना, पुरावे देऊनही त्याला जामीन मिळत असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त करत सेनेला धारेवर धरले आहे.
पोलिस जामीन रद्द करण्यासाठी प्रयत्न का करत नाहीत, असा सवाल उपस्थित करतानाच कुचिकवर दोन दिवसांपासून फेसबुकवर पोस्ट टाकून गायब असलेल्या मुलीवर बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी चित्रा वाघ यांनी केली. शहराध्यक्ष गिरीश पालवे, भाजपा नेते लक्ष्मण सावजी, हिमगौरी आहेर-आडके, संध्या कुलकर्णी आदी उपस्थित होते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम