कोठुरे सोसायटीचा शतकपुर्ती महोत्सव साजरा

0
52

द पॉईंट नाऊ प्रतिनिधी : कोठूरे येथील विविध कार्यकारी सोसायटीचा शतकपुर्ती सोहळा साधेपणाने व कोविड-१९ च्या नियमाचे पालन करून साजरा करण्यात आला.

यावेळी सत्यनारायण पुजेचे आयोजन करण्यात आलेले होते. सोसायटीचे जेष्ठ सभासद महादू दगडू मोगल सपत्नीक यांच्या हस्ते सत्यनारायण पूजन केले.

याप्रसंगी संस्थेचे चेअरमन मोतीराम मोगल, व्हा.चेअरमन दीपक डोंगरे, संचालक आशिष मोगल, विजय मोगल, कैलास मोगल, धोंडीराम कडलग, ज्ञानेश्वर गिते, अमोल कांबळे, निलेश चांदोरे, रविंद्र कोरडे, भारत गायकवाड, मिराबाई पवार, मालती मोगल, सुर्यकांत मोगल, राजेश गायकवाड, माधव मोगल, लक्ष्मण उगले, विष्णु पिठे, सचिव शिवाजी तुगावे यांच्यासह जेष्ठ सभासद सभासद अशोक मोगल, परशराम मोगल, माधव गीते, बाजीराव मोगल, भाऊसाहेब फडताळे, त्रंबक मोगल, सुयोग गीते, मधुकर पवळे, बाळकृष्ण मोगल, प्रमोद उगले, यांच्यासह हितचिंतक उपस्थित होते. यावेळी कोविड-१९ च्या नियमांचे मास्क, सॅनिटायझर यांचे काटेकोरपणे पालन करण्यात आला.

या शतकपुर्ती महोत्सव प्रसंगी बोलताना संस्थेचे चेअरमन मोतीराम मोगल यांनी वर्षीय कामजाजचा लेखा-जोखा मांडला. सोसायटी तर्फे खतविभाग व स्वस्त धान्य दुकान चालविले जाते. सभांसदांकरीता वेळोवेळी खतपुरवठा केला जातो. तसेच संस्थेची शेती औजारे सभासदांना भाडेतत्वावर दिली जातात. संस्थेमार्फेत विविध सामाजिक कार्यात मोलाचे योगदान असते.

नाशिक जिल्हा सहकारी मध्यवर्ती बॅंकेच्या कर्जाची वसुली १०० टक्के व्हावी हा उद्देश समोर ठेवून प्रयत्नशील असते.

विविध कार्यकारी सोसायटीची गेल्या ५ ते ६ वर्षांपासुनची १०० टक्के वसुलीची परंपरा सोसायटीचे चेअरमन मोतीराम मोगल व संचालक मंडळाच्या प्रयत्नांनी यावर्षीही कायम राखण्याचा प्रयत्न केला आहे. संस्थेने चालु २०२१-२२ या आर्थिक वर्षात एनडीसीसी बॅंकेतर्फे अल्पमुदत कर्ज, द्राक्षे, उस, डाळींब, आले, आदी पिकांसाठी तर मध्यम मुदत कर्ज ट्रॅक्टर, द्राक्षमंडप, पाईपलाईन, आदी. करीता कर्जवाटप केलेले आहेत. सदरील अल्प मुदत व मध्यम मुदत कर्ज ३० जुन २०२२ च्या आत १०० टक्के वसुलीसाठी प्रयत्नशील आहोत.

सोसायटीचा शतक महोत्सव यशस्वी होण्यासाठी निवृत्ती चोभे, नामदेव चांदोरे, माधव बोराडे, सुनील ब्राह्मणे यांनी अथक परिश्रम घेतले.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here