निफाड प्रतिनिधी : शिवसेनेचे पक्षप्रमुख तथा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्हय विधान व अवमानकारक शब्द वापरल्यामुळे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याविरोधात आंदोल केले.
यावेळी शिवसेनेचे माजी आमदार अनिल कदम यांच्या नेतृत्वाखाली तालुकाप्रमुख सुधीर कराड उपजिल्हाप्रमुख निलेश पाटील अनिल पाटील कुंदे सभापती सुलभाताई पवार ,माजी सभापती शिवा पाटील सुरासे राजेश पाटील विक्रम रधवे आदींच्या उपस्थितीत निफाड तालुका शिवसेनेच्यावतीने निफाड येथील तहसील कचेरीसमोर जोरदार घोषणाबाजी करून जाहीर निषेध करण्यात आला.
निफाड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रंगराव सानप यांना यावेळी तालुका शिवसेनेच्यावतीने निवेदन देण्यात आले. यावेळी संजय कुंदे ,शंकर संगमनेरे गोटू बागुल, देवेंद्र काजळे,नंदू पवार,अमोल भालेराव, खंडू बोडके पाटील बाळा सरोदे ललित गीते दीपक पुंड आदींसह लोकप्रतिनिधी व शिवसैनिक उपस्थित होते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम