नाशिक प्रतिनिधी : महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित लोकनेते व्यंकटराव हिरे कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२१-२२ साठी गरीब व होतकरू विद्यार्थीनीसाठी मालाबार चॅरिटेबल ट्रस्टकडून नुकतीच १६ लाख १४ हजार रुपये शिष्यवृत्ती मंजूर करण्यात आली.
या शिष्यवृत्तीचे वितरण आज महाविद्यालयात करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून मालाबार चॅरिटेबल ट्रस्ट चे नाशिक शाखाप्रमुख रोहित सोनार उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. एस. जगदाळे उपस्थित होते. मालाबार चॅरिटेबल ट्रस्ट या जागतिक ग्रुपच्या वतीने शिक्षणासाठी शिष्यवृत्ती दिली जाते. त्यासाठी डिसेंबर महिन्यात महाविद्यालयात रोहित सोनार यांचे उद्बोधनपर व्याख्यान आयोजित केले होते. या कार्यक्रमात उपस्थित एकूण २०७ विद्यार्थीनीनी ऑनलाईन अर्ज भरून दिले होते.
अर्जदारांपैकी सुमारे १८० विद्यार्थीनिनीची गुणानुक्रमे व वार्षिक उत्पन्नाच्या आधारावर निवड करण्यात आली. याप्रसंगी मालाबारचे व्यवस्थापक श्री. रोहित सोनार यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले की, आजच आरटीजीएसद्वारे सर्व विद्यार्थिनीच्या खात्यात सर्व रक्कम वर्ग करण्यात येईल. या शिष्यवृत्तीचा विनियोग योग्य करावा. ज्यांना गरज आहे अशा विद्यार्थिनींना आपण कायमच सहकार्य करू असे सांगतानाच अनेक समाजोपयोगी कामे मालाबार ट्रस्ट कडून केले जातात याची माहिती त्यांनी दिली यावेळी मालाबार चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने १६ लाख १४ हजार शिष्यवृत्तीचा चेकचे वितरण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. एस. जगदाळे यांच्याकडे प्रदान करण्यात आला. या उपक्रमासाठी मा. डॉ. योगिता अपूर्व हिरे, अध्यक्षा, महा. विकास समिती व विश्वस्त, म.गांधी विद्यामंदिर यांचे मार्गदर्शन लाभले.
युवती सक्षमीकरण करण्यासाठी मालाबार ट्रस्ट वेगवेगळ्या योजनेचा सतत प्रयत्न करत असते. आजचा हा उपक्रम विद्यार्थीनीच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा आहे. कारण युवती ही सक्षम झाली पाहिजे स्वत:च्या पायावर उभी राहायला पाहिजे. रक्कम ही छोटीशी आहे पण आपल्यासाठी आपल्या करियरसाठी खूप महत्वाची आहे. जस मालाबार गोल्ड आणि डायमंड याला मुल्य आहे. तसेच आजच्या युवती ह्या भारताच्या भविष्यासाठी अतिशय महत्वाच्या आहेत व त्यामुळे त्या मूल्यवान आहेत. हे मुल्य जपण्यासाठी खूप मोठे व्हा, शिक्षण सुरु ठेवा मलबार ग्रुप नेहमी तुमच्यासाठी नवीन नवीन योजना राबवत राहील असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. सर्व युवतींना भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रम प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. एस. जगदाळे यांनी ‘ बचतीचे महत्त्व सांगितले मुलींनी आतापासून बचत केली तर भविष्यात नक्कीच बचतीचे योग्य फायदे होऊ शकतात. आपल्या महाविद्यालयातील जास्तीत जास्त विद्यार्थीनीना शिष्यवृत्ती प्रदान करण्यासाठी आपण विनंती केली होती. पण मलबार ग्रुपने पहिल्यांदाच १८० विद्यार्थींना ८ ते १० हजार रुपये शिष्यवृत्ती दिली ही आपल्यासाठी अमूल्य भेट आहे असे उद्गार काढले. व शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थिनींचे अभिनंदन केले. व मालाबार चॅरिटेबल ट्रस्टला धन्यवाद देऊन आभार मानले.
याप्रसंगी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व परिचय डॉ. प्रकाश शेवाळे यांनी केला. व आभार प्रा. एस. पी. व्याळीज यांनी मानले. प्रास्ताविक विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. राकेश पाटील यांनी केले. याप्रसंगी व्यासपीठावर महाविद्यालयातील उपप्राचार्य, डॉ. एन. बी. पवार, डॉ. मृणाल भारद्वाज, डॉ. विनीत रकिबे, डॉ. संतोष चोबे, मलबार ग्रुपचे पदाधिकारी व मलबार चॅरिटेबल ट्रस्ट शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थीनी उपस्थित होत्या.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम