स्वप्निल अहिरे
द पॉईंट नाऊ प्रतिनिधी : पुरोगामी पत्रकार संघ ही एक संघटना नसुन ती ताकद आहे. तिचा पुरेपुर वापर समाजहितासाठी करावा. अन्याय तिथे पुरोगामी पत्रकार संघ असे प्रतिपादन पुरोगामी पत्रकार संघाचे नाशिक जिल्हा अध्यक्ष संतोष जाधव यांनी व्यक्त केले. ते अखिल भारतीय पुरोगामी पत्रकार संघाच्या नुतन पदाधिकारी पदग्रहण समारंभात अध्यक्ष स्थानावरून बोलत होते. व्यासपीठावर पुरोगामी पत्रकार संघाचे राज्य उपाध्यक्ष ज्ञानेश्वर बागुल, कैलास गर्दे, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष युवराज राजपुत आदि उपस्थित होते.
अखिल भारतीय पुरोगामी पत्रकार संघाचा जिल्हा पदाधिकारी पदग्रहण समारंभ संस्थापक अध्यक्ष विजय सुर्यवंशी यांच्या आदेशानुसार नाशिक येथील शासकीय विश्रामगृह येथे संपन्न झाला. अध्यक्ष संतोष जाधव यांनी उपस्थीत सर्व पदाधिकारी व सदस्य यांना यशाचा कानमंत्र देवून कामकाज कसे करायचे या बाबत माहिती दिली. त्याच प्रमाणे राज्य उपाध्यक्ष ज्ञानेश्वर बागुल यांनी संघटनेत गटतटाचे राजकारण करू नये असे आवाहन केले.
पुरोगामी पत्रकार संघाच्या जिल्हा मुख्य कार्यकारिणीत रफिक सैयद(कार्याध्यक्ष), शेखर सोनवणे ( उपाध्यक्ष), अशीक अली (सचिव), प्रदिप देवरे ( संघटक ), गणेश बागुल (उपाध्यक्ष), राजू सैय्यद ( खजिनदार ), चंदकांत जोशी (सह संघटक) यांची निवड करण्यात आली. तर महिला कार्यकारिणीत जिल्हा अध्यक्ष म्हणुन मनिषा पवार, रुपाली जाधव (जिल्हा कार्याध्यक्ष), ज्योती जाधव (जिल्हा उपाध्यक्ष), दामिणी बागुल (जिल्हा उपाध्यक्ष) यांची नियुक्ती करण्यात आली. नाशिक शहर अध्यक्ष पदी मुक्तार शेख, पंकज अहिरराव (कार्याध्यक्ष), महिला शहराध्यक्षपदी भारती हुजरे, रुपाली काटे (उपाध्यक्ष), यांची निवड करण्यात आली.
बागलाण तालुका अध्यक्ष पदी हिरालाल बाविस्कर, कार्याध्यक्ष पदी मनोज बागुल, उपाध्यक्ष म्हणून नारायण भोये, दिंडोरी तालुका अध्यक्ष म्हणून अमोल भालेराव, देवळा तालुका अध्यक्ष म्हणून जगदीश निकम, कळवण तालुका अध्यक्ष म्हणून मुकेश सोनवणे यांची निवड करण्यात आली. तर पुरोगामी पत्रकार संघ संचलीत पोलीस मित्र समितीच्या राज्य अध्यक्ष पदी आनंद दाणी, गाव विकास समितीच्या जिल्हा अध्यक्ष म्हणुन स्वप्निल आहिरे यांची निवड करण्यात आली. तर अन्याय अत्याचार निवारण समितीच्या जिल्हा अध्यक्ष पदी कल्याणी धोंडगे यांची निवड करण्यात आली.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम