17 वर्षीय तरुणीवर करण्यात आले चाकूने वार

0
40

द पॉईंट नाऊ ब्युरो : प्रेम या गोष्टीची संकल्पना पिढी दर पिढी बदलत चालली आहे की काय? असे वाटू लागले आहे. पुण्यात एकतर्फी प्रमातून एका युवकाने 17 वर्षीय युवतीवर हल्ला केल्याची घटना घडली आहे.

पुणे येथे 17 वर्षीय युवतीवर युवकाने धारदार चाकूने वार केले. यात संबंधित तरुणी जबर जखमी झाली आहे. ज्ञानेश्वर राजेंद्र निंबाळकर असे संबंधित युवकाचे नाव असून, त्याच्याविरोधात युवतीने तक्रार दाखल केलेली आहे. हा प्रकार पुण्याच्या चंदननगर परिसरात घडला.

या प्रकारच्या घटना सध्या वाढू लागल्या आहेत. यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. पालकांनी देखील याबाबत काळजी घेणे आवश्यक आहे. युवा वर्गाची बदलती मानसिकता हा सध्या चिंतेचा विषय बनत चालला आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here