नाशकात तपोवन कॉर्नर येथे बस अपघातात एकाचा मृत्यू

0
35

द पॉईंट नाऊ प्रतिनिधी : नाशिक शहरात आज शिवशाही बसचा अपघात घडल्याने एकाचा मृत्यू झाला आहे. नाशकात तपोवन कॉर्नर येथे हा अपघात घडला.

नाशिकहून औरंगाबादकडे ही शिवशाही बस चालली होती. त्यात समोरून एक दुचाकीस्वार भरधाव वेगात आला. त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात बसचालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस उड्डाणपुलाच्या खांबावर जाऊन आदळली. यात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे.

या अपघातात बसमधील चार प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींवर रूग्णालयात उपचार सुरू आहेत.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here