द पॉईंट नाऊ प्रतिनिधी : शिवस्मारकस्थळी कळवण नगरपंचायत गटनेते कौतिक पगार व सुनीता पगार यांच्या हस्ते शिवस्मारकाचे Shivsmarak मंत्रोच्चारात पूजन करण्यात आले. शिवतीर्था पर्यंत ढोल ताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आतशबाजीत छत्रपती शिवाजी महाराजांंची व जिजाऊ, मावळे यांची वेशभूषा परिधान करुन अश्व व प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली. व शहरातील अठरा पगड जातीच्या सर्व मान्यवरांच्या हस्ते नियोजित पुतळ्याच्या ठिकाणी विधीवत भूमिपूजन केली.
यावेळी कौतिक पगार, भूषण पगार बाबुलाल पगार, अशोक पगार, परशुराम पगार, त्र्यंबक पगार, कारभारी पगार, मधुकर पगार, शंकर पगार, बाजीराव पगार, बेबीलाल संचेती, धनंजय पवार, देवीदास पवार, नारायण हिरे, राजेंद्र भामरे, अशोक पवार, मोहनलाल संचेती, रंगनाथ देवघरे, डॉ. जी. व्ही. मालपुरे, आर. के. महाजन, सुधाकर पगार, विश्वनाथ व्यवहारे, रवी राऊत, मोतीराम पवार, रमेश शिरसाठ, रविंद्र शिरोडे, के. के. शिंदे, दादाजी निकम मनोज देवरे आदी मान्यवरांच्या हस्ते विधीवत भूमिपूजन करण्यात आले. महाराज युवा फाउंडेशनचे अध्यक्ष रोहित पगार यांनी 5 लाख 11 हजार देणगी दिली. असे समितीचे भूषण पगार यांनी सांगितले.
पुतळ्याचे वेगळेपण आकर्षणाचा विषय….
तब्बल २१ फूट उंच, १७ फूट लांबी आणि ७ टन वजन असा विक्रमी अश्वारूढ शिवपुतळा कळवण तालुक्यातील शिवतीर्थावर साकारण्याचा मार्ग शासनाच्या कला संचालनालयाने व मुख्य वास्तुशास्त्रज्ञ यांनी परवानगी दिल्यामुळे मोकळा झाला आहे. यामुळे अनेक वर्षांपासून कळवणवासियांनी बघितलेले छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवस्मारकाचेही स्वप्न सत्यात उतरणार आहे.
महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा व्हावा यासाठी कळवण तालुका छत्रपती स्मारक समितीकडून गेल्या अनेक वर्षांपासून प्रयत्न सुरू आहेत. या प्रयत्नांना अखेर यश आले असून, छत्रपतींचा अश्वारूढ पुतळा उभारण्यास महाराष्ट्र शासनाचे कलासंचलनालय व मुख्य वास्तुशास्त्रज्ञ यांनी परवानगी दिली आहे.
या पुतळ्यासाठी साधारण तीन कोटी रुपये खर्च असलेल्या या शिवस्मारकासाठी नगरपंचायतीने शहराच्या मध्यवर्ती भागात , अंबिका चौकात अर्धा एकर जागा उपलब्ध करून दिली असून, सुशोभीकरणासाठी ५० लाख रुपये खर्चाची तरतूद केली आहे.
तसेच संपूर्ण स्मारकासाठी साधारणत: तीन कोटी रुपये खर्च अपेक्षित असून, लोकवर्गणीतून हे शिवस्मारक (Shivsmarak) आकार घेणार आहे. सुमारे सव्वा कोटी रुपये अपेक्षित खर्च असलेल्या या अश्वारूढ पुतळ्याला तयार करण्याचे काम विश्वविख्यात शिल्पकार, पद्मश्री राम सुतार यांच्या दिल्ली येथील स्टुडिओत एक महिन्यापासून सुरू आहे. एप्रिलच्या सुरवातीस पुतळा कळवणवासीयांना मिळण्याची शक्यता आहे.
दिवाळीपर्यंत हे शिवस्मारक तयार होणार आहे. याशिवाय पुतळ्याच्या चारही बाजुला सुशोभीकरण करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे हे सर्व प्रकल्प लोकवर्गणीतून साकारणार आहेत. उत्तर महाराष्ट्रातील सगळ्यात मोठा पुतळा असलेले हे शिवस्मारक ठरणार असून, तालुक्याच्या शिरपेचात मानाचा रोवला जाणार असल्याने गावोगावी आनंदोत्सव साजरा होत आहे.
भव्य शिवपुतळा आणि शिवस्मारकामुळे आदिवासीबहुल कळवणच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला जाणार आहे. उत्तर महाराष्ट्रातील सर्वात भव्य शिवस्मारक करण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे. यासाठी आवश्यक सर्व परवानग्या मिळाल्या आहेत. लोकवर्गणीसाठी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. सगळ्यांनी या सुवर्णक्षणांचा साक्षीदार होण्यासाठी सहभागी व्हावे व आपापली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडावी.
– भूषण कौतिक पगार, अध्यक्ष, कळवण तालुका छत्रपती स्मारक समिती
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम