द पॉईंट नाऊ ब्युरो : यवतमाळ मध्ये शिवसेना नेत्याची गोळ्या झाडून हत्या केल्याची घटना घडली आहे. यवतमाळ कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुनील डीवरे यांची हत्या झाली आहे.
सुनील डीवरे यांची त्यांच्या भाम्ब या गावात घरात घुसून हत्या करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. तीन अज्ञात हल्लेखोरांनी डीवरे यांच्यावर गोळीबार केला आणि पसार झाले.
दरम्यान, पोलिसांनी डीवरे यांना रुग्णालयात दाखल केले मात्र त्यांचा जीव वाचू शकला नाही. डीवरे यांच्या कार्यकर्त्यांनी रुग्णालयाबाहेर गर्दी केली होती. पोलीस याबाबत अधीक तपास करत आहेत.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम