सिलेंडरचा पुन्हा भडका ! सर्वसामान्यांची तिरडी केंद्र सरकारने काढावी – बलकवडे

0
29

नाशिक प्रतिनिधी : गॅस दरवाढीच्या विरोधात राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्ष सौ. प्रेरणा बलकवडे यांच्या नेतृत्वाखाली तालुकानिहाय आंदोलन करण्यात आले. गॅस सिलेंडर चे भाव वाढल्याने सर्वसामान्य जनता होरपळून निघाली आहे. केंद्र सरकारने घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरच्या दरात पुन्हा वाढ केली असून, भाजप सरकारने जनतेला वाऱ्यावर सोडले आहे. महागाई चे चटके सर्वाधिक महिलांना सोसावे लागत आहेत.  दिवसेंदिवस वाढत जाणारी

महागाई ,इंधनवाढ,गॅसवाढ आणि यामुळे हतबल झालेला सर्वसामान्य नागरिक……कोठे मांडायच्या या व्यथा. आजपर्यंत कर्जबाजारीमुळे आत्महत्या होत होत्या पण इथुन पुढे “महागाईचे बळी”पडतील इतके भितीदायक वातावरण सर्वसामान्य नागरिकांमध्ये आहे. अशी टिका राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्ष प्रेरणा बलकवडे यांनी केली.

केंद्र सरकारच्या जुलमी गॅस -डिजेल दरवाढी विरोधात आज राष्ट्रवादी महिला काँग्रेस नाशिक जिल्ह्याच्या वतीने आंदोलन करण्यात आले.

नशिक सिन्नर फाटा येथे राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्ष सौ. प्रेरणा बलकवडे यांच्या उपस्थितित आंदोलन करण्यात आले. गॅस सिलेंडरचे भाव वाढल्याने गॅस सिलेंडरची तिरडी काढून महिलांनी निषेध व्यक्त केला. गॅस दरवाढ थांबली नाही तर महिलांवर आत्महत्येची वेळ येईल. पुन्हा गॅसदर वाढवले तर सर्वसामान्यांची तिरडी केंद्र सरकारने काढावी अशी चेतावनी प्रेरणा बलकवडे यांनी सरकारला दिली. आजपर्यंत शेतकरी आत्महत्या करत होते पण या महागाईमुळे आता महिलांना आत्महत्या करण्याची वेळ आली आहे याची जबाबदारी मोदी साहेब घेणार का? असा प्रश्न प्रेरणा बलकवडे यांनी विचारला.

महिला आंदोलकांनी सरकारचा तीव्र निषेध करत “मोदी तेरे राज मे, जनता बुरे हाल मे,” “केंद्र सरकार हाय हाय,” “मोदीजी का देखो खेल महंगा सिलेंडर, महंगा तेल”, “बहोत हुई महंगाई की मार !!बस करो मोदी सरकार!!”अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला. गेल्या काही दिवसांपासून गॅसच्या किमतीत सतत वाढ होत आहे. त्यामुळं येत्या काही दिवसांत सर्वसामन्यांचे जेवण महागणार आहे. दरवाढीचा त्रास सर्वसामान्य ची कोरोनाकाळात आर्थिक स्थिती मंदावली असतांना सरकार जीवनाश्यक वस्तूंमुळे सर्व सामान्य जनतेची गळचेपी होत आहे.

त्यामुळं आता सर्वसामन्यांना जास्त पैसे खर्च करावे लागतील. विना अनुदानित गॅस सिलिंडरच्या किमतीत विक्रमी वाढ झाली आहे.

सरकारी तेल कंपन्यांनी घरगुती गॅस सिलेंडरच्या दरामध्ये 25 रुपयांनी वाढ केली आहे. तर कमर्शियल गॅस सिलेंडरच्या दरामध्ये 68 रुपयांनी वाढ केली आहे. 17 ऑगस्टपासून ही दरवाढ लागू झाली आहे. त्यामुळं आता एका गॅसमागे सर्वसामन्यांना ८५९.५ रुपये मोजावे लागणार आहे.

यावेळी राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्ष प्रेरणा बलकवडे, गायत्री झांजरे , रुबिना खान, स्वाती मोरे, राधा जाधव, सुलताना शेख,पद्संगिता उमाप, मनिषा झांजरे यांच्यासह असंख्य महिला उपस्थित होत्या.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here