सर डॉ. एम. एस. गोसावी महाविद्यालयातर्फे प्रजासत्ता दिनानिमित्त तांदूळ व किराणा मालाचे वाटप

0
36

नाशिक प्रतिनिधी : सर डॉ. एम. एस. गोसावी कॉलेज ऑफ कॉमर्स, नाशिक व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने प्रजासत्ताक दिनानिमित्त नाशिक त्र्यंबकेश्वर येथील जय महाराष्ट्र ओम त्रंबकराज अनाथ बालगृह आश्रम येथे तांदूळ व किराणा मालाचे वाटप करण्यात आले.

प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने सर डॉ. एम. एस. गोसावी कॉलेज ऑफ कॉमर्स च्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाने नाशिक त्र्यंबकेश्वर येथील श्री त्रंबकराज अनाथ आश्रम येथे भेट देऊन तेथील विद्यार्थ्यांसोबत प्रजासत्ता दिन साजरा केला.
याप्रसंगी या अनाथ आश्रमाचे संचालक डॉ. फकीरराव अहिरराव यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले आणि समाज सेवा तसेच राष्ट्र सेवा ही स्वयंसेवकांकडून घडत राहो असा विश्वास व्यक्त केला.

राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी सहा. प्रा. विशाल बर्वे व उपस्थित सर्व स्वयंसेवकांनी आश्रमातील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. स्वयंसेवकांकडून अनाथाश्रमातील मुलांसाठी कपड्यांचे वाटप देखील करण्यात आले.
महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. मनिष राणे यांचे मार्गदर्शन लाभले.

 


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here