द पॉईंट नाऊ ब्युरो : पूजा करत असलेल्या आपल्या सासुवर एका सुनेने गोळी झाडून तिची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.
यवतमाळ जिल्ह्यामधील आर्णी या गावी हा धक्कादायक प्रकार घडला. सासू – सुनेचा आधी वाद झालेला होता. त्याचा राग सुनेने मनात धरून ठेवत त्यांच्या शेजारील निवृत्त जेलरची बंदूक चोरून आणली होती. सासू पूजेला बसली असतांना, सुनेने सासुवर या बंदुकीतून गोळी झाडली, ज्यात सासूचा दुर्दैवी मृत्यू झाला.
सासू – सुनेचा वाद होत असतो. हे सर्वश्रुतच आहे. मात्र यवतमाळ मध्ये सासू – सुनेचा हा झालेला वाद मात्र थेट टोकाची भूमिका घेत संपला.
या घटनेत पोलिसांनी सुनेला अटक केली असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम