वैभव पगार
लखमापुर प्रतिनिधी : येथील नामकिंत मेगाफाईन कंपनीत स्फोट होऊन झालेल्या दुर्घटनेत एक ठार व चार जण जखमी झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, लखमापुर शिवारातील मेगाफाईन या कंपनीत मध्यरात्री एका विभागातील रिअँक्टर मशिनला अचानक आग लागुन स्फोट झाला.
यामध्ये त्या विभागांमध्ये काम करणारे कामगार केशव सुनीराम धुळे ( रा.ननाशी ता.दिंडोरी), बाजीराव निवृत्ती चव्हाण ( रा.अंजनेरी ता.त्र्यंबकेश्वर) , रवींद्र गोपाळा गो-हाळे ( रा.दोनवडे) ,हे किरकोळ जखमी झाले असून ,कमलेश रमेश गवळी व संदिप वसंत गायकवाड ( रा.मडकीजांब ता.दिंडोरी ) हे गंभीर जखमी झाले. त्यात उपचारादरम्यान संदिप गायकवाड यांचा मुत्यू झाला आहे.
या घटनेची माहिती कंपनीचे प्राँडक्शन अधिकारी प्रमोद बाळकृष्ण बच्छाव यांनी तात्काळ वणी पोलिसांना कळवली. वणी पोलिसांत अकस्मात जळीत प्रकरण म्हणून नोंद करण्यात आली असुन पुढील तपास वणी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक स्वप्नील राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रतन पगार, पी.आर शेलार ,धुळे इ. पोलीस वर्ग तपास करीत आहेत. या दुर्दैवी घटनने लखमापूर व परिसरात हळहळ व्यक्त केली जात.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम