नाशिक प्रतिनिधी : नगरपंचायत निवडणुकीतील उमेदवार एका अपघातात मृत्युमुखीपडले आहेत, भरधाव दुचाकी वरील ताबा सुटल्याने गाडी झाडावर जाऊन आदळली. या दुर्घटनेत सुरगण्याच्या दोघांचा जागीच मृत्यू झाला तर एकजण गंभीर जखमी आहे. जखमीवर उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहिती नुसार रात्री पावणेअकरा वाजेच्या सुमारास राहुल गोपाळ चौधरी (वय. २३,रा. उबरपाडा( सु), भोला हिरामण बागुल (वय २२, रा. साबरदरा ह.मु. सुरगाणा) व पंकज जयराम पवार (रा.२१ बोरपाडा कोटंबी ह.मु. सुरगाणा) हे रात्री वणीकडून सुरगाणाकडे एम.एच.१५, एच.एन.२७११ या सुझुकी दुचाकीने जात होते. मात्र काळाने घाला घालून जीवन संपवले.
दुचाकी घागबारी फाट्याच्या पुढील फरशीजवळच्या वळणावर ताबा सुटल्याने एका झाडावर गाडी आदळली. घटना घडल्यानंतर दुचाकी पंचवीस ते तीस फुट खोल खड्ड्यात पडली. या घटनेत राहुल गोपाळ चौधरी हा गंभीर जखमी झाला आहे. त्याच्या कमरेच्या मणक्यांमध्ये दुखापत झाल्याने पुढील उपचारासाठी पंचायत समितीचे सदस्य एन.डी.गावित यांनी नाशिक येथील रुग्णालयात दाखल केले आहे.
तर भोला हिरामण बागुल व पंकज जयराम पवार यांच्या डोक्याला गंभीर मार इजा झाल्याने ते जागीच ठार झाले आहेत. घागबारीचे पोलिस पाटील गोपाळ गायकवाड, माजी सेवा निवृत्त मुख्याध्यापक चिंतामण गायकवाड, पंडित तुंगार पोलिस गोतुर्णे यांनी घटनास्थळी धाव घेत १०८ रुग्णवाहिकेतून वणी येथील रुग्णालयात दाखल केले. मात्र पंकज व भोला यास डॉक्टरांनी मृत घोषित केले. भोला हा ग्रामसेवक हिरामण बागुल यांचा एकुलता एक चिरंजीव होता.
त्याने परिस्थितीवर मात करत इंजिनिअरिंगच्या तिस-या वर्षात (third year engineering) नाशिक येथील महाविद्यालयात शिक्षण घेत होता. त्याचा सांभाळ सुरगाणा गावाचे दिवंगत पोलिस पाटील रामभाऊ यांनी त्याचा सांभाळ केला होता.
तदनंतर चंद्रकांत भोये हे सांभाळ करीत होते. नुकत्याच झालेल्या सुरगाणा नगरपंचायतीच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक १२ मध्ये राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने त्याने निवडणूक लढविली होती. त्याचा निकाल येत्या १९ जानेवारी रोजी जाहीर करण्यात येणार आहे.
राहुल हा शिक्षक भास्कर चौधरी यांचा पुतण्या तर एन.डी.गावित यांचा भाचा आहे. या घटनेने सुरगाणा शहर व परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलिस गोतुर्णे, गवळी, पोलिस उपनिरीक्षक निलेश बोडके, पोलिस निरीक्षक संदीप कोळी हे अधिक तपास करीत आहेत.
घागबारी फाटा ते भितबारी खिराड फाटा हा अडीच ते तीन किलोमीटरचा रस्ता मृत्यूचा सापळा बनला असून या टप्प्यात आज पावेतो चाळीस ते पंचेचाळीस जणांचा रस्ते अपघातात मृत्यू झाल्याचे पोलिस पाटील गायकवाड यांनी सांगितले.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम