ज्येष्ठ पत्रकार विश्वास देवकर यांना सेवाव्रती ‘लोकशिक्षक’ पुरस्कार

0
45

त्र्यंबकेश्वर प्रतिनिधी : श्रीक्षेत्र बेझे चाकोरे येथे श्रीराम शक्तीपीठात शनिवार दिनांक 15 जानेवारी रोजी अनुग्रह वर्धापन दिनाचे निमीत्ताने विविध कार्यक्रम आयोजन करण्यात आले असून. यामध्ये धर्म ध्वजारोहण होणार आहे. या ध्वजाची उंची 51 फुट असून त्यावर आकर्षक दक्षिणात्य कलाकृतींनी सजावट देखील केलेली आहे.

ब्रह्मचारी सोमेश्‍वर चैतन्य कल्याणकारी संस्था आणि श्रीराम शक्तीपीठातर्फे ज्येष्ठ पत्रकार प्रा.विश्वास देवकर यांना सेवाव्रती लोकशिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. श्रीराम शक्तीपीठाचे पीठाधीश्वर अनंत विभूषित श्री श्री 1008 महामंडलेश्वर स्वामी सोमेश्‍वरानन्द सरस्वतीजी महाराज (पंचायती आखाडा श्री निरंजनी) आणि सचिव, ब्रह्मचारी सोमेश्‍वर चैतन्य कल्याणकारी संस्था श्री क्षेत्र चाकोरे (बेजे)यांनी पुरस्काराची घोषणा केली. संस्थेच्या वर्धापनदिनी आज 15 जानेवारीला सकाळी अकरा वाजता यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.डॉ.ई. वायूनंदन यांच्या हस्ते श्री देवकर यांना सन्मानित करण्यात येणार आहे. 51 हजार रूपये रोख, सन्मान पत्र, सन्मान चिन्ह, महावस्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. गेल्या 30 वर्षांपासून पत्रकारिता, लोकशिक्षण, अध्यात्म व सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल श्री देवकर यांना सन्मानित करण्यात येणार आहे.

संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष श्री महन्त रवींद्र पुरीजी महाराज (अध्यक्ष मनसा देवी ट्रस्ट, हरिद्वार तथा पंचायती आखाडा श्री निरंजनी ) , श्रीमद परमहंस परिव्राजकाचार्य निरंजन पीठाधीश्वर अनंत विभूषित श्री श्री 1008 आचार्य महामंडलेश्वर स्वामी कैलाशगिरीजी महाराज (पंचायती आखाडा श्री निरंजनी , हरिद्वार), आनंद पीठाधीश्वर अनंत विभूषित श्री श्री 1008 आचार्य महामंडलेश्वर स्वामी बालकानंदगिरीजी महाराज (तपोनिधी पंचायती आनंद आखाडा ), महन्त रामरतन गिरीजी महाराज (सचिव , पंचायती आखाडा श्री निरंजनी ) महन्त दिनेश गिरीजी महाराज (सचिव, पंचायती आखाडा श्री निरंजनी), श्री महन्त केशवपुरीजी महाराज (सचिव, पंचायती आखाडा श्री निरंजनी), श्री महन्त सागरानन्द सरस्वतीजी महाराज (अध्यक्ष, आनन्द आखाडा) आदी साधू, संन्यासी व मान्यवरांच्या उपस्थितीत श्री क्षेत्र चाकोरे बेजे येथे विश्वशांती श्री हनुमान धर्म ध्वजारोहण करण्यात येणार आहे. संस्थेतर्फे गोपालन, आदिवासी भागात आरोग्य संवर्धन, शिक्षण प्रसार, कुपोषण निर्मूलन, व्यसनमुक्ती, युवा संघटन , धर्म जागरण, अंधश्रद्धा निर्मूलन आदि उपक्रम राबविण्यात येत आहेत.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here