द पॉईंट नाऊ प्रतिनिधी : नाशिक जिल्ह्यातील सर्व नागरिकांना लसीकरणाचा बूस्टर डोस देण्यात यावा, या प्रकारचे निवेदन नुकतेच राष्ट्रवादी माहिती आणि तंत्रज्ञान सेलचे जिल्हाध्यक्ष संकेत निमसे यांच्याद्वारे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.
सध्या कोरोनाने पुन्हा एकदा डोके वर काढत आपले हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. त्यात कोरोनासाठीचे दोन्ही डोस घेऊनही कोरोना झाल्याच्या बऱ्याच बाबी समोर आल्या आहेत. त्यामुळे आता नागरिकांना कोरोना लसीचा बूस्टर डोस देण्यात यावा अशी मागणी होते आहे. याबाबतच निवेदन संकेत निमसे यांनी जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांना दिले.
तसेच कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता नाशिक जिल्ह्यात लसीकरणाचा वेग वाढवावा, नुकतेच सुरू करण्यात आलेले 15 ते 18 वयोगटातील लसीकरणचे दोन डोस मधील अंतर कमी करावे अशी मागणी करण्यात आली आहे.
निवेदन देतेप्रसंगी अध्यक्ष संकेत निमसे यांसह उपाध्यक्ष प्रतीक रायते, गौरव सूर्यवंशी, सरचिटणीस अनिल गोसावी, शुभम मुरकुटे, निखिल निकम, विशाल लभडे, सागर दरेकर, तुषार सानप, अक्षय मोरे, प्रितेश भदाणे, प्रमोद कदम, नारायण गुंजाळ आदी उपस्थित होते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम