हिरे महाविद्यालयात लसीकरणासाठी महाविद्यालयात उदंड प्रतिसाद

1
11

नाशिक प्रतिनिधी : महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित लोकनेते व्यंकटराव हिरे महाविद्यालय मोफत लसीकरणाचे आयोजन. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे आरोग्य हित लक्षात घेऊन केंद्र व राज्य सरकारने कोविड १९ प्रतिबंधक लसीकरण बंधनकारक केल्यानंतर नाशिक महानगरपालिका आरोग्य विभाग यांच्यावतीने महाविद्यालयात आज १५ ते १८ वर्षाच्या मुलांसाठी करोना प्रतिबंधक लसीचे लसीकरण सुरु करण्यात आले.

लसीकरण करून घेण्यासाठी मुलामुलींनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. आज सकाळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. एस. जगदाळे, उपप्राचार्या डॉ. सुचिता सोनवणे यांच्या उपस्थित उद्घाटन करून लसीकरणाला प्रारंभ करण्यात आला. यावेळी डॉ. जगदाळे यांनी या प्रसंगी आरोग्य विभागाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. श्री मितेश देशमुख, डाटा ऑपरेटर साधना घोडे, नर्स प्रिया राऊत, सुनिता भोये यांना गुलाब पुष्प देऊन स्वागत केले. महाविद्यालयाचे प्राचार्य यांनी या प्रसंगी विद्यार्थ्यांना व्हॅक्सिनेशन चे महत्व व गरज विशद केली तसेच साथीच्या आजाराच्या काळात शारीरिक व मानसिक आरोग्य व अभ्यास याविषयी मार्गदर्शन केले. तसेच लस घेण्यासाठी आलेल्या या वयोगटातील मुला व मुलींशी संवाद साधला. तसेच लस घेतल्यानंतरही कोविड-१९ च्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन यावेळी त्यांनी केले. लस घेण्याबाबत या वयोगटात असणाऱ्या मुला व मुलींमध्ये असणारी उत्सुकता यावेळी त्यांनी जाणून घेतली.

महाविद्यालयातील २०३३ विद्यार्थ्यांच्या लसीकरण मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात तीनशे विद्यार्थ्यांना लसवंत करण्यात आले. या प्रसंगी कनिष्ठ विभागाचे पर्यवेक्षक श्री.भदाणे एस. एन. उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक तसेच महाविद्यालयातील सर्व प्राद्यापकांनी योगदान दिले.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here