सायबर जागृकता काळाची गरज – पो. अधिक्षक सचिन पाटील

0
15

अश्विनी भालेराव
महाविद्यालयीन प्रतिनिधी : सायबर सिक्यूरिटीमध्ये हॅकर बिग डेटा ॲनालिसीस करत असतात. ते होऊ नये म्हणून सजगता बाळगणे आवश्यक आहे. पत्रकारांनी पुढच्या १० वर्षात जे जे तांत्रिक बदल होताय त्यावर लक्ष ठेवले आहे. आपल्या क्षेत्रात तंत्रज्ञानाचा वापर करून घ्यायला हवा, त्यासाठी ते तंत्र शिकणे गरजेचे आहे. असे प्रतिपादन नाशिक ग्रामीणचे पोलिस अधिक्षक सचिन पाटील यांनी केले.

पत्रकार दिनाच्या निमीत्ताने एचपीटी आर्ट्स अँड आरवायके सायन्स महाविद्यालयाच्या नामदार गोपाळ कृष्ण गोखले पत्रकारीता आणि जनसंज्ञापन विभागाद्वारे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
श्री. पाटील म्हणाले येणारा काळ हा पुर्णपणे डिजीटल होत असून डिजीटल माध्यमांना अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त होणार आहे. मात्र हे होत असताना यातून फसवणूकीचे प्रकार दुपटीने वाढतील. याकरीता पोलिस प्रशासन यंत्रणा सज्ज आहेच, मात्र प्रत्येकाने आपली स्वतःची काळजी स्वतः घेणे सोबत आपण अशा कुठल्याही परिस्थीतीला बळी पडणार नाही याची दक्षता घेणे तितकेच आवश्‍यक आहे. येणाऱ्या काळात सर्वच प्रकारची महत्त्वपूर्ण माहिती ही डिजीटल माध्यमांवर उपलब्ध असेल. त्यामुळे सायबर गुन्हेगारांना मोकळ रान मिळेल; आपल्याला आलेला कुठलाही मेसेज, लिंक, ई- मेल आपण पूर्ण खात्री केल्याशिवाय उघडू नये अन्यथा याची आपल्याला मोठी किंमत मोजावी लागू शकते.

पत्रकार हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहे, त्यामुळेच सामाजिक जबाबदारीही त्यांच्या खांद्यावर आहे. त्याकरिता पत्रकारीतेच्या प्रत्येक विद्यार्थ्याने सायबर सिक्यूरीटीबाबत स्वतः सजग राहून इतरांनाही जागृत करणे गरजेचे आहे. असे अमूल्य मार्गदर्शन या कार्यक्रमाच्या निमीत्ताने सचिन पाटील यांनी सर्व उपस्थितांना केले. कोरोनाची वाढती रूग्णसंख्या शासन नियमांचे पालन व्हावे यादृष्टीने पूर्णपणे आभासी मंचावर घेण्यात आला.

प्रारंभी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. एन. सुर्यवंशी यांनी पत्रकारीता आणि जनसंज्ञापन विभागाच्या यशस्वी वाटचालीचा परिचय सर्वांना करून दिला. त्यानंतर प्राध्यापक रमेश शेजवळ यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व प्रमुख अतिथींचा परिचय केला. यावेळी उपप्राचार्य डॉ. प्रणव रत्नपारखी, उपप्राचार्यायाडॉ. मृणालीनी देशपांडे, विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. आनंदा खलाणे, विविध विभागांचे प्रमुख व विद्यार्थी उपस्थीत होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. मार्मिक गोडसे व विभागातील विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. रमेश शेजवळ यांनी केले.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here