नाशिक प्रतिनिधी : डॉ. एम. एस. गोसावी कॉलेज ऑफ कॉमर्स, नाशिक चे राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे विशेष श्रमसंस्कार शिबिराचा समारोप समारंभ रविवार( दि.२) रोजी संपन्न झाला. कार्यक्रमासाठी ‘द पॉईंट नाऊ’चे संपादक अंकुश सोनवणे, सरपंच हिराबाई गभले , उपसरपंच भगवान गभले, डॉ. मनीषा राणे प्राचार्य, मीरा गभले (ग्रामपंचायत सदस्य), प्रा. विशाल बर्वे (रा.से. यो. कार्यक्रम अधिकारी), सहा. प्रा. मंगल शिंदे आणि इतर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिबिराच्या समारोप कार्यक्रम प्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी सोनवणे म्हणाले ”राष्ट्रीय सेवा योजनेत विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्त्व विकास होत असून ग्राम विकासाला निश्चित दिशा मिळत आहे.” याचा गावकऱ्यांनी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी फायदा करून घ्यायला हवा, सोशल मीडियावर वावरतांना सामाजिक भान जोपासले पाहिजे.
या शिबीरार्थींनी सात दिवसीय शीबिरामध्ये विविध उपक्रम राबवले यामध्ये सार्वजनिक ठिकाणच्या परिसराची स्वच्छता करण्यात आली. वृक्षारोपण करून अस्तित्वात असलेल्या झाडांना आळी करून पाणी देण्यात आले. सांडपाण्याची व्यवस्था दुरुस्ती, रस्ते दुरुस्ती, जलसंधारण विषय कामेही करण्यात आली. प्रबोधन उद्बबोधन उपक्रमात डॉ. अनिल सावळे यांचे ‘पर्यावरण आणि मैत्री’ या विषयावर व्याख्यान झाले. तसेच डॉ. संजय सावले यांनी “ग्रामीण विकासचे महत्व” पटवून दिले. डॉ. अश्विनी देशपांडे : ‘सामाजिक बांधीलकी’ श्री. दत्ता देशमने : ‘सर्प समज-गैरसमज’ , डॉ. हरी वांगरवर : ‘व्यक्तिमत्व विकास’, डॉ. भास्कर नरवटे: ‘महापुरुषांचे विचार व आजचा युवक’, या विषयांवर व्याख्याने संपन्न झाली .
सांस्कृतिक कार्यक्रम उपक्रमातून अंधश्रद्धा निर्मूलन, पर्यावरण जागृती, स्त्रीभृण हत्या जागृती, आरोग्य जागृती, कोविड विषयक जागृती, ग्रामस्वच्छता अभियान विषयक जागृती, वृक्षसंवर्धन याबाबत जागृती, व्यसनमुक्ती बाबत जागृती, आदी विषयांवर प्रसंग नाट्य सादर करण्यात आली.
शिबिरात एकूण २५ विद्यार्थी सहभागी झाले होते.
शिबिराचे संयोजन प्रा. विशाल बर्वे यांनी केले.
महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. मनीषा राणे, जलालपुर गावचे सरपंच मा.हिराबाई गभले, ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील, ग्रामसेवक, महाविद्यालयाच्या शिक्षकेत्तर कर्मचारी व इतर सर्वांनी शिबिराच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. ध्रुव महाजन यांने केले. आभार प्रा. मंगल शिंदे यांनी मानले.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम