हिरे महाविद्यालयात ‘राज्यस्तरीय वेबिनार’ संपन्न..

0
58

नाशिक प्रतिनिधी : महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित लोकनेते व्यंकटराव हिरे महाविद्यालयात ‘इतिहास विभाग’ आणि ‘इतिहास अभ्यास मंडळ’, म. गां. वि यांच्या संयुक्त विद्यमाने “महाराष्ट्राच्या सामाजिक आणि सांस्कृतिक इतिहास”, या विषयावर राज्यस्तरीय वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. एस. जगदाळे यांनी या राज्यस्तरीय ऑनलाइन वेबिनारला शुभेच्छा दिल्या. आपल्या मनोगतात ते म्हणाले की, महाविद्यालयातील इतिहास विभाग आणि इतिहास अभ्यास मंडळ (म. गां. विद्यामंदिर) यांच्या संयुक्त समन्ववयातुन वेगवेगळ्या विषयांवर चर्चासत्र, सेमिनार आणि वेबिनार हे निश्चितच विषयाची उपयुक्तता विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्याचे महत्त्वाचे कार्य करतात. इतिहासाचा उलगडा व नाविन्यपूर्ण माहिती अशा प्रकारच्या वेबिनार मधून मिळत असल्याने विद्यार्थ्यांनी त्याचा उपयोग करणे आवश्यक असल्याचे ते आपल्या शुभेच्छापर मनोगतात म्हणाले.

या राज्यस्तरीय वेबिनारमधील पहिल्या व्याख्यानाचे पुष्प प्रा. डॉ. के. एल गिरमकर यांनी “महाराष्ट्राचा सांस्कृतिक इतिहास’ या विषयावर गुंफले. आपल्या व्याख्यानात त्यांनी प्राचीन ते अर्वाचीन असा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा समग्र कालपट उलगडून दाखवला. महाराष्ट्राच्या भौगोलिक सीमा, पेहराव वसाहत, स्वभाव, भाषा, संस्कृती, वारसा यातून महाराष्ट्राच्या संस्कृतीची जडणघडण झालेली असल्याचे त्यांनी सांगितले. ‘महाराष्ट्र’ या अर्थाचा प्रादेशिक भूप्रदेश व त्याची जडणघडण कशा पद्धतीने होत गेली याची सुसंगत पणे मांडणी आपल्या व्याख्यानातून केली.

या वेबिनारमधील दुसरे पुष्प प्रा. डॉ. शारदा बंडे यांनी ‘ ‘महाराष्ट्राचा सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनातील स्रियांची भूमिका’’ या विषयावर गुंफले. त्या म्हणाल्या कि, महाराष्ट्राचा सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनातील स्रियांचे कार्य अतिशय महत्त्वाचे असून देखील त्यांच्या कार्याची दखल आणि स्त्रियांच्या कर्तुत्वाचा इतिहास दुर्दैवाने लिहिला गेला नाही. सामाजिक जीवनातील पुरुषसत्ताक पद्धतीमुळे स्त्रियांच्या कार्य व कर्तुत्वाला दुय्यम स्थान दिले गेले. मात्र विसाव्या शतकात स्त्रीवादी चळवळीच्या माध्यमातून त्यांच्या कार्याची दखल स्त्रीकेंद्री इतिहासलेखनात घेतली गेली. महाराष्ट्राच्या सामाजिक व सांस्कृतिक जीवनात सावित्रीबाई फुले, ताराबाई शिंदे, पंडिता रमाबाई, दुर्गा भागवत, रमाबाई रानडे, अनुताई वाघ यांनी केलेल्या कार्याचा इतिहास त्यांनी उलगडून दाखवला.

राज्यस्तरीय चर्चासत्रातील अध्यक्षीय समारोपात बोलतांना संस्थेच्या ‘इतिहास अभ्यास मंडळाचे’ अध्यक्ष आणि नामपूर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. पी. भामरे यांनी महाराष्ट्राच्या संस्कृतीचे यथार्थ दर्शन घडवीत महाराष्ट्राच्या सामाजिक आणि सांस्कृतिक अभ्यासात महाराष्ट्रातील लोकगीते, लोककला, पोवाडा, लावणी, नृत्य, कला यांचे महत्व अधोरेखित केले. यावेळी ऑनलाइन व्यासपीठावर महाविद्यालयाचे उपप्राचार्य तथा सिनेट सदस्य डॉ. नंदू पवार, आय. क्यू. ए. सी. समन्वयक तथा अधिष्ठाता, मानव्यविद्या शाखा, (म. गां. वि) प्रा. डॉ. मृणाल भारद्वाज, नँक समन्वयक, डॉ. किशोर निकम मानव संसाधन विभाग समन्वयक, डॉ. विनीत रकिबे, अकॅडमीक विभाग समन्वयक, डॉ. संतोष चोबे, इस्टेट विभागाचे सुपर वायझर डॉ. एस. डी पाटील उपस्थित होते.

वेबिनारच्या प्रास्ताविकेतून समन्वयक तथा इतिहास विभाग प्रमुख डॉ. प्रगती मारकवार यांनी राज्यस्तरीय वेबिनारची भूमिका आणि वेबिनारमधील विषयाचे महत्त्व विशद केले. सदर वेबिनारचे सूत्रसंचालन प्रा. कीर्ती वर्मा यांनी केले. साधन व्यक्तींचा परिचय प्रा. गोरख शेवाळे यांनी करून दिला तर आभार प्रा. रुचिरा दंडगव्हाळ यांनी मानले. सदर कार्यक्रमास विभाग प्रमुख, प्राध्यापक, संशोधक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here