वैभव पगार – प्रतिनिधी : दिंडोरी | शिक्षकांनी जे संस्कार दिले आहेत. त्या संस्काराची शिदोरी तुमच्यासोबत घेऊन येणाऱ्या परीक्षांना सामोरे गेल्यास यश निश्चित मिळेल असे प्रतिपादन खासदार भास्कर भगरे यांनी केले. दिंडोरी जनता इंग्लिश स्कुल व उच्च माध्यमिक विद्यालयात वार्षिक गुणगौरव सोहळा व इयत्ता 10वी व 12वी विद्यार्थी आशीर्वाद समारंभ प्रसंगी भगरे प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मविप्र संचालक प्रवीण नाना जाधव होते. भास्कर भगरे पुढे बोलतांना म्हणाले आपले भविष्य घडविणे तुमच्या हातात आहे. त्यासाठी मनापासून अभ्यास करा, गुणवत्ता वाढवा, स्पर्धा परीक्षांचा मार्ग निवडा, वेगवेगळी क्षेत्रे निवडा, मार्ग नक्कीच सापडेल. आपल्या जनता इंग्लिश स्कुलमध्ये विविध उपक्रम राबविले जातात मविप्र संस्थेची ही एक आदर्श अशी शाखा असून इतर शाळेंसाठी प्रेरणादायी असे स्कुल आहे.
विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी व संस्था व शिक्षक व कर्मचारी यांच्या समस्या सोडविण्यासाठी मी प्रयत्नशील असेल असेही भगरे यांनी बोलतांना सांगितले. यावेळी खासदार भास्कर भगरे, मविप्र संचालक प्रवीण नाना जाधव, उपनगराध्यक्ष शैलाताई उफाडे, माध्यमिक शालेय समिती अध्यक्ष बाळासाहेब मुरकुटे, उच्च माध्यमिक समिती अध्यक्ष दत्तात्रय जाधव, जेष्ठ सदस्य शिवाजी भाऊ जाधव, माजी सैनिक संघटना अध्यक्ष भारत खांदवे, अनिल दादा देशमुख, गुलाब तात्या जाधव, आण्णासाहेब बोराडे, रामदास पिंगळ, सुभाष बोरस्ते, बाळासाहेब आंबेकर, भाऊसाहेब बोरस्ते, नगरसेवक प्रदीप घोरपडे, संतोष आंबेकर, बंडू भाऊ भेरे, संजय बोडके, मधुकर जाधव, केशव खराटे, मनोज ढिकले, साहेबराव घोलप, धीरज देशमुख, संतोष कदम, आप्पा वाटाणे, डीएड कॉलेज प्राचार्य डॉ. संजय काळोगे, प्राचार्या निर्मला जाधव, जनता इंग्लिश स्कुल प्राचार्य शरद शेजवळ, उपप्राचार्य उत्तम भरसठ, पर्यवेक्षक सविता शिंदे, रावसाहेब उशीर आदी मान्यवर उपस्थित होते.
Dindori | दिंडोरीतील शासकीय आरोग्यकेंद्रांमध्ये श्वानदंशावरील लसींचा तुटवडा
कार्यकांच्या सुरवातीला छत्रपती शिवाजी महाराज व सरस्वती प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्तविक प्राचार्य शरद शेजवळ यांनी केले. त्यांनी बोलताना दिंडोरी जनता इंग्लिश स्कुलची स्थापना दिवस, शाळेचे पाहिले विद्यार्थी निकम व जिजाबाई मुळाणे, पहिले मुख्याध्यापक बाराहाते आदींची माहिती सांगून विद्यालयात राबविण्यात येणाऱ्या उपक्रमाची माहिती दिली व विद्यार्थी व शिक्षक यांना येणाऱ्या अडचणी एसटी बस, विद्यार्थी होस्टेलची आवश्यकता याबाबत सविस्तर माहिती दिली. यावेळी वर्षभरात विविध क्षेत्रात यशस्वी झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, मेडल, शालेय वस्तू बक्षिसे मान्यवरांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले. अध्यक्ष मनोगत व्यक्त करताना मविप्र संचालक प्रवीण नाना जाधव यांनी बोलतांना सांगितले. स्पर्धेच्या युगात टिकून राहायचे असेल. तर अपयशात खचून जायचं नाही.
आपली आई दारापुढे रांगोळी काढते तिला माहिती आहे. ही रांगोळी पुसली जाणार तरी ती काढते तिच्या सौंदर्याचा आनंद दुसऱ्याला देते जीवन हे असेच आहे. एकदा प्रयत्न करा दुसऱ्याला आनंद द्या. पुन्हा प्रयत्न करा यश हमखास मिळेल. आपल्या जीवनाची दिशा आपण ठरवा. यावेळी उष्कृष्ट प्रशासक व नेतृत्व म्हणून कामकाज करणारे विद्यालयाचे प्राचार्य शरद शेजवळ सर यांचा व उपशिक्षिका श्रीमती मंगला बागुल यांनी साऊथ एशिया मास्टर ॲथलेटिक्स ओपन चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक मिळवले. त्याबद्दल दोघांचाही खासदार भास्कर भगरे सर व मविप्र संचालक प्रवीण नाना जाधव यांच्या हस्ते शाल व गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांपैकी श्रुती वागमोडे व प्रणिता मोगल यांनी आपल्या गुरुविषयी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे नियोजन सांस्कृतिक समिती प्रमुख श्रीम एस.एम वीरकर व सर्व सदस्य शिक्षकांनी केले. सूत्रसंचालन संतोष कथार, सरला कदम, नेहा देशमुख यांनी तर आभार पर्यवेक्षक रावसाहेब उशीर यांनी मानले.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम