द पॉइंट प्रतिनिधी : सायबर गुन्हेगार देशात मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. अनैतिक मार्गाने झटपट पैसे कमविण्यासाठी देशभरात अनेक सायबर टोळ्या सक्रिय झाल्या आहेत. या टोळ्या दररोज अनेकांना गंडा घालत आहेत. मात्र, या सायबर गुन्हेगारांनी आता वृद्धांना टार्गेट करणं सुरू केलंय. अश्लील कॉल करून वृद्धांना ब्लॅकमेल केलं जातंय. अनेक वृद्ध नागरिक अशा कॉल ला बळी पडत आहेत. हा विषय सध्या चिंतेचा असून नागरिकांनी सतर्क होण्याची गरज आहे.
गुन्ह्याचे स्वरूप बद्दले असून काही दिवसांपासून सेक्सस्टोर्शन चे प्रमाण वाढत चालले आहेत. यासाठी सायबर गुन्हेगारांच्या अनेक टोळ्या सक्रिय झाल्या आहेत. यात तरुणींचा सुद्धा मोठ्या प्रमाणात सहभाग आहे. वृद्धांना संपर्क करून सोशल मोडिया किंवा थेट फोन करून या टोळ्या त्यांना टार्गेट करताहेत. वृद्धांच्या मोबाईल वर अश्लील व्हिडीओ पाठवला जातो. किंवा त्यांना फोन करून अश्लील संवाद साधला जातो. त्यानंतर लगेच फोन करून क्राईम ब्रँच किंवा सायबर सेल मधून बोलत असल्याचं सांगत खंडणी म्हणून मोठी रक्कम मागितली जाते. यामुळे वृद्धांना बदनामी पेक्षा पैसे देत असल्याचे देखील समोर आले आहे.
महाराष्ट्रात अनेक भागात हे प्रकार घडत आहेत. नागपुरातील अनेक वृद्ध या प्रकाराला बळी पडल्याची माहिती समोर आली. काही वृद्ध असे प्रकार लगेच ओळखून घेतात. तर काही वृद्धांना धोका लक्षात येत नाही. त्यामुळं त्यांची फसवणुक होते. मात्र, नागरिकांनी घाबरून न जाता समोर येण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे. या गुन्ह्या संदर्भात नागरिकांना सतर्क करणे , गरजेचं असल्याचे समोर आले आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम