Deola | देवळ्यात एस.टी भाडेवाढ विरोधात शिवसेनेचे आंदोलन

0
11
Deola
Deola

सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | एस.टी महामंडळाने प्रवास भाड्यात भरमसाठ वाढ केल्याच्या निषेधार्थ आज मंगळवारी (दि.२८) रोजी शिवसेनेच्या (उद्धव ठाकरे गट) वतीने देवळा येथील बस स्थानकात आंदोलन छेडले व अन्यायकारक भाडेवाढ मागे घ्यावी, या आशयाचे निवेदन येथील वाहतूक नियंत्रक भूषण आहेर यांना सादर करण्यात आले.
निवेदनाचा आशय असा की, एसटी महामंडळाने गेल्या दोन दिवसांपूर्वी भाडे वाढ संदर्भात घेत‌लेला निर्णय हा सर्वसामान्य जनता, शालेय विद्यार्थी, जेष्ठ नागरीक, महिला वर्ग, सर्वसामान्य गोरगरीब जनतेला न परवडणारा असून, त्यांना आपल्या खिशातून अधिकचे पैसे मोजावे लागत असल्याने सर्वसामान्य जनतेच्या खिशाला कात्री लावण्याचे काम सुरू केले आहे.

Deola | देवळा येथे क्रिकेट खेळण्यासाठी गेलेल्या तरुणाचा हृदयविकाराने मृत्यू

याआधीच गोरगरीब जनता हि महायुती सरकारच्या अनागोंदी कारभाराला त्रस्त झाली असून, जीवनावश्यक सर्वच वस्तू महाग झाल्याने जनता आर्थिक संकटात सापडली आहे. त्यात बस भाडे दरात वाढ केल्याने जनतेमध्ये प्रचंड नाराजी व्यक्त केली जात आहे. याची शासनाने दखल घेऊन भाडे वाढ रदद करावी, या मागणीसाठी मंगळवारी (दि.२८) रोजी शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाच्या वतीने बस स्थानक आवारात आंदोलन छेडण्यात आले. तालुका संघटक प्रशांत शेवाळे, शहर प्रमुख विश्वनाथ गुंजाळ, उप तालुका प्रमुख विलास शिंदे, भरत देवरे, उप तालुका संघटक विजय आहेर, भास्कर अहिरे, नितीन शेवाळे, सोमनाथ शिंदे, खंडू जाधव, जितेंद्र भामरे आदि उपस्थित होते.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here