Deola | देवळा तालुक्यातील झीरेपिंपळ शिवारात बिबट्याचा वावर

0
16
Deola
Deola

सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | तालुक्यातील झीरेपिंपळ येथील शेतकरी संजय जिभाऊ सावळे यांच्या गट नं. ३३३ उसाच्या शेतात बिबट्या आढळून आल्याने आजूबाजूच्या शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. याठिकाणी बिबट्याचा वावर असल्याची माहिती येथील शेतकऱ्यांनी वनविभाला दिली असून, आज मंगळवारी (दि.२८) रोजी वनविभाच्या कर्मचाऱ्यांनी घटनस्थळी भेट देऊन उसाच्या शेतसह आजूबाजूला पाहणी केली. वनविभागाला बिबट्या व बछड्यांची ठसे आढळून आले. वनविभाने शेतकऱ्यांना खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. तर शेतकऱ्यांनी बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली. यावेळी शेतकरी संजय सावळे, महेंद्र आहेर आदी उपस्थित होते.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here