NAFED Onion Scam | ‘नाफेड’कडून पुन्हा गोलमाल..!; बफर स्टॉक केलेला उन्हाळ कांदा लाल झाला..?

0
16
NAFED Onion Scam
NAFED Onion Scam

NAFED Onion Scam | गेल्या काही महिन्यांपूर्वी नाफेड (NAFED) अध्यक्षांनी नाशिक जिल्ह्यातील नाफेडच्या काही खरेदी विक्री केंद्रांवर धाड टाकली होती. ज्यात या खरेदी विक्री केंद्रावरील गैरव्यवहार उघडकीस आला होता. हे प्रकरण ताजे असतानाच आता पुन्हा एकदा नाफेडचा गोलमाल उघडकीस आला आहे. चांगल्या कांद्याची खरेदी केलेली असताना ग्राहकांना सडका आणि खराब कांदा विकला जात असल्याचे प्रकरण पेटत असतानाच आता बफर स्टॉक केलेल्या उन्हाळ कांद्याऐवजी चक्क दुय्यम दर्जाचा लाल कांदा हा परराज्यात पाठवला जात असल्याचा प्रकार उघडकीस आल्याचे समजते.

Onion Export Ban | सभेत घोषणा देणारा ‘तो’ तरुण शरद पवारांच्या भेटीला; नेमकं काय घडलं..?

NAFED Onion Scam | नेमकं प्रकरण काय..?

सर्वसामान्य नागरिकांना कांदा रास्त दरात उपलब्ध व्हावा. यासाठी केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार विभागाने भाव स्थिरीकरण योजनेअंतर्गत रब्बी उन्हाळ कांद्याची खरेदी केली होती. या कांद्याचे सप्टेंबरपासून जिल्ह्यातून टप्प्याटप्प्याने देशभरात वितरण सुरू झाले. यानुसार लासलगाव रेल्वे स्टेशनवरून गुरुवारी (दि.५) रोजी उन्हाळ कांदा लखनऊला जाणार होता. ते पडताळण्यासाठी शेतकरी संघर्ष समितीचे सानप आणि संत हे तेथे गेले असता सदर गोण्यांमध्ये पॅकिंग केलेला कांदा हा उन्हाळ कांदा नसून, तो नुकताच बाजारात आलेला खरीपचा लाल कांदा असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. नाफेडने जर बफर स्टॉकमध्ये उन्हाळ कांदा खरेदी केला होता. तर तो लाल कांदा कसा झाला..? असा प्रश्न उपस्थित करत चौकशीची मागणी केली जात आहे. (NAFED Onion Scam)

Onion Export Ban | ज्यांनी केली निर्यात बंदी; त्यांनाच करा मतदान बंदी!

प्रशासनाकडून मुस्कटदाबी..?

हा सर्व प्रकार निदर्शनास आल्यानंतर पुरावा स्वरूप व्हिडीओ काढण्याचा प्रयत्न केला असता व्हिडीओ काढण्यास मनाई करण्यात आली. व्हिडीओ डीलीट करावा यासाठी पोलिस यंत्रणेकडून दबाव आणण्यात आला. त्यानंतर बाहेर पडण्याचा प्रयत्न केला असता तेथील आरपीएफ पोलिसांनी पोलिस स्टेशनमध्ये नेले, असे गंभीर आरोप सानप आणि संत यांनी केले आहेत. दरम्यान, या प्रकरणामुळे बफर स्टॉक खरेदीत मोठा घोटाळा झाल्याची शंका नाकारता येत नसून या व्यवहाराची लवकरात लवकर चौकशी करण्याची मागणी सर्व स्तरावरून करण्यात येत आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here