Deola | देवळ्यात सुराणा पतसंस्थेच्या वतीने गॅस गळती दुर्घटनेतील वारसाला ११ हजारांची आर्थिक मदत

0
23
#image_title

सोमनाथ जगताप – प्रतिनिधी: देवळा | येथील सुराणा पतसंस्थेच्या वतीने गॅस गळती दुर्घटनेत मयताच्या वारसास सामाजिक बांधिलकी जोपासत ११ हजाराची आर्थिक मदत करण्यात आली. याबाबत सविस्तर वृत्त असे कि, देवळा येथील पेंटर साहेबराव दादाजी पवार हे दि. २३ ऑगष्ट रोजी सकाळी देवळा येथील आबेडकर नगर येथे पोपट चिमाजी गांगुर्डे यांच्या येथील घरी गॅस गळती झाल्याने त्यांना मदतीसाठी धावून गेले असता. यात पवार हे गंभीर जखमी झाले.

Deola | देवळ्यात जागतिक दिव्यांग दिन साजरा

सामाजिक बांधिलकी जोपासत तात्काळ पवार कुटूंबाला ११ हजाराची मदत निधी दिली

नाशिक येथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. पवार यांची घरची हलाक्याची परिस्थिती असून मयत पवार यांच्या पत्नी उषा पवार यांनी सुराणा पतसंस्थेकडे आर्थिक मदतीची मागणी केली असता पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. रमणलाल सुराणा यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत तात्काळ पवार कुटूंबाला ११ हजाराची मदत निधी दिली. यावेळी संस्थेचे संस्थापक डॉ. रमणलाल सुराणा, विद्यमान चेअरमन प्रदीप सुराणा, व्हा. चेअरमन संजय कानडे, संचालक रमेश संकलेचा, राजेंद्र सुराणा, सुभाष सोनवणे, जनार्दन शिवदे, संतोष लोढा, सुनिल बुरड, प्रविणकुमार सुराणा आदींसह शांताराम पवार व कर्मचारी उपस्थित होते.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here