सोमनाथ जगताप – प्रतिनिधी: देवळा | येथे श्रावण बाळ दिव्यांग विकास बहुउद्धेशीय संस्थेच्या वतीने मंगळावर (दि. ३) रोजी जागतिक दिव्यांग दिन साजरा करण्यात आला. पंचायत समितीच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमात दिव्यांगांना त्यांच्या हक्कांची जाणीव करून देणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे. शासनाच्या वतीने दिव्यांग बांधवांसाठी पाच टक्के निधी दिला जातो. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उमेश निकम यांनी केले.
Deola | देवळ्यात कालवा फुटून झालेल्या नुकसान भरपाईसाठी ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषण
शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन
संस्थेचे अध्यक्ष प्रविण देवरे, सचिव अर्जुन देवरे यांनी आपल्या संस्थेचा आदर व्यक्त करून प्रमुख मान्यवरांना दिव्यांगाच्या स्वावलंबनासाठी चालना देण्यासाठी आजचा जागतिक दिव्यांग दिन मेळावा घेऊन यात शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा. असे आवाहन करण्यात आले. यावेळी नायब तहसीलदार बबन आहिरराव, गटविकास अधिकारी राजेश कदम, सहायक गटविकास अधिकारी भरत वेंदे, तालूका आरोग्य अधिकारी डॉ. सुधीर पाटील, नगरपंचायतीचे जुगल घुगे, संजय गांधी निराधार योजनेचे कुणाल शिरसाठ, प्रहार संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा जाधव, संस्थेचे उपाध्यक्ष यशवन्त देवरे, मीना पवार आदी ग्रामस्थ व दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम