Chhagan Bhujbal | विधानसभा निवडणुकीत बहुमत मिळवून देखील महायुती सरकारचा सत्ता स्थापनेचा तिढा कायम आहे. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गृहमंत्री पदावर दावा केल्यामुळे पेच निर्माण झाल्याचे बोलले जात आहे. या घडामोडींवर युतीतील वरिष्ठ नेते छगन भुजबळ यांनी आता भाष्य केले आहे.
काय म्हणाले छगन भुजबळ?
“गृह खात्यावरून काही अडले असेल असे वाटत नाही. ‘आम्ही चर्चेतून सर्व गोष्टी सोडवू.’ असे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे. गृह खाते हे जितके चांगले आहे. तितकेच अडचणीचेही आहे. कुठेतरी खून होणार आणि राजकीय मोर्चे निघणार. ते सगळे गृहमंत्र्याला पहावे लागते. रात्रंदिवस चालणारे ते काम आहे.” भुजबळ यांनी म्हटले आहे.
भरत गोगावले यांनी ‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सत्ते बाहेर राहून काम करण्यासाठी आग्रही असल्याचे म्हटले होते. त्यावर प्रश्न विचारला असता, भुजबळ यांनी “मी काही तसे ऐकलेले नाही. बाकीच्या ज्या इतर गोष्टी आहेत. त्या तुम्ही नेहमी सूत्रांकडून माहिती मिळाल्याचे सांगताच. आम्हाला देखील जे माहीत नसते ते सूत्राला माहीत असते. पण हे सूत्र नेमके कोण? त्याचा मी अजून शोध घेत असून त्याचा नंबर तरी मला द्या. तो कुठे राहतो ते तरी कळेल.” अशी मिश्किल टिपणी यावेळी भुजबळ यांनी केली आहे.
तसेच भाजपच्या 132 जागा आहेत. 144 झाले की सरकार बनते. त्यामुळे सहाजिकच भाजपचाच मुख्यमंत्री होणार. असा पुनर्विचार यावेळी भुजबळांकडून करण्यात आला यापूर्वी देखील भुजबळांनी जागा अधिक असल्याने राज्यात भाजपचाच मुख्यमंत्री होणे स्वाभाविक असल्याचे म्हटले होते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम