Political News | ‘मंत्रीपदाच्या शर्यतीत मी नाही’; उपमुख्यमंत्रीपदाच्या चर्चांना श्रीकांत शिंदेंनी दिला पूर्णविराम

0
42
#image_title

Political News | महाराष्ट्रात 5 डिसेंबर रोजी नवीन सरकार स्थापन होणार आहे. मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीस यांचे नाव निश्चित मानले जात असून उपमुख्यमंत्री पदाचा तिढा सुटलेला नाही. दिल्ली येथील बैठकीनंतर एकनाथ शिंदे त्यांच्या मुळगावी गेले होते. तिथे ते दोन दिवस वास्तव्यास होते. त्यानंतर ते मुंबईत परतले. परंतु आता त्यांची तब्येत बिघडल्याचे सांगितले जात असून त्यामुळे सोमवारचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.

Political News | युतीत राजकिय घडामोडींना वेग; मुंबईतील बैठकीत गृहमंत्रीपदाचा पेच सुटणार?

गेल्या दोन दिवसांमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांचे सुपूत्र खासदार श्रीकांत शिंदे यांचे नाव घेतले जात होते. एकनाथ शिंदे केंद्रात मंत्री पद मिळवतील व राज्यामध्ये श्रीकांत शिंदे उपमुख्यमंत्री होतील. अशा बातम्याही आल्या होत्या. यावर आता श्रीकांत शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली असून “असे काही नसल्याचे” म्हटले आहे. “लोकसभा निवडणुकीनंतर केंद्रात आपल्याला मंत्रीपदाची संधी होती. परंतु पक्ष संघटनेचा विचार करून ती संधी आम्ही नाकारली.” असे श्रीकांत शिंदे यांनी आपल्या एक्स अकाउंट वरून पोस्ट करत म्हटले आहे.

काय म्हणाले श्रीकांत शिंदे?

महायुती सरकारचा शपथविधी थोडा लांबल्यामुळे सध्या चर्चा व अफवांचे पीक फोफावले असून काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रकृती अस्वास्थ्येमुळे 2 दिवस गावी विश्रांती घेतली. त्यामुळे अफवांना अधिकच जोर आला. मी उपमुख्यमंत्री होणार अशा बातम्या देखील प्रश्नचिन्ह टाकून गेले दोन दिवस दिल्या जात आहेत. परंतु यामध्ये कोणतेही तथ्य नसून माझ्या मुख्यमंत्री पदाबाबतच्या सर्व बातम्या निराधार आहेत.

Political News | ‘ईव्हीएममध्ये घोटाळा शक्य!’; महादेव जानकरांच्या दाव्यामुळे खळबळ
“लोकसभेनंतर मला केंद्र सरकारमध्ये मंत्रिपदाची संधी होती. परंतु पक्ष संघटनेच्या कामाकरिता विचार करून मी तेव्हा देखील मंत्रीपदाला नकार दिला होता. मला सत्तेतल्या पदाची लालसा नसून राज्यातील सत्तेत कोणत्याही मंत्रीपदाच्या शर्यतीत मी नाही. हे पुन्हा एकदा स्पष्ट करतो. मला लोकसभा मतदारसंघ व शिवसेना या पक्षासाठीच काम करायचे आहे. माध्यमांचा उत्साह व स्पर्धा आम्ही जाणतो. पण बातम्या देताना त्यांनी वास्तवाकडे पाठ फिरवू नये. ही विनंती. माझ्या संदर्भातील चर्चांना आता तरी पूर्णविराम मिळेल अशी अपेक्षा.” असे म्हणत एक्सवरून पोस्ट करत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here