Dada Bhuse | राज्यात सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर महायुतीचा मुख्यमंत्री कोण होणार याची जोरदार चर्चा रंगत आहे. त्यातच काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री पदाबाबत आमचा कोणताही आग्रह नसल्याचे जाहीर केले. त्यामुळे राज्यात आता भाजपाचा मुख्यमंत्री होणार हे जवळपास निश्चित मानण्यात येत आहे. मात्र शिवसेनेने मुख्यमंत्रीपदावरचा दावा सोडला असला तरी उपमुख्यमंत्री पदासाठी शिवसेनेकडून एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे, कोकणातील शिवसेनेचे नेते उदय सामंत यांच्या नावाची चर्चा होती, मात्र आता शिवसेनेचे जेष्ठ नेते दादा भुसे यांचेही नाव उपमुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत आघाडीवर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे महायुती सरकारमध्ये उत्तर महाराष्ट्राला दादा भुसे यांचे रूपाने उपमुख्यमंत्री पद मिळणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Dada Bhuse | दादा भुसे यांनी केला एक लाख मतांचा टप्पा पार; सर्व विरोधक मिळून निम्म्यावरच
दादा भुसे यांनी या निवडणुकीत एक लाखाहून अधिक मतांनी विजय मिळवला
याआधीही उत्तर महाराष्ट्रातील राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी उपमुख्यमंत्रीपद भूषविले होते. दादा भुसे यांनी मालेगाव बाह्य या विधानसभा मतदारसंघातून 1 लाखाहून अधिक मतांनी विजय मिळवला. त्याचप्रमाणे ते पाचव्यांदा आमदार झाले आहेत. त्यामुळे जेष्ठतेच्या निकषानुसार त्यांना उपमुख्यमंत्री पद मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यांनी मागील सरकारमध्ये राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री पद व जिल्ह्याचे पालकमंत्री पदवी भूषविले होते.
Dada Bhuse | मतदान प्रक्रिया संपताच भुसे जनतेच्या सेवेत हजर; तातडीने अपघातग्रस्तांच्या मदतीला धावले
दादा भुसे यांना उपमुख्यमंत्री पद मिळण्याच्या चर्चांना उधाण
2014 साली देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील भाजप-शिवसेनेच्या सरकारमध्ये सहकार व ग्रामविकास राज्यमंत्री पद मिळाले होते. तर 2019 साली महाविकास आघाडीच्या उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये थेट कॅबिनेट मंत्रीपद मिळाले होते. त्यामुळे दादा भुसे यांना उपमुख्यमंत्री पद मिळण्याची जोरदार चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगताना दिसत आहे. नाशिक जिल्ह्यात शिवसेनेचे पंधरापैकी फक्त दोन आमदार आहेत. मात्र दादा भुसे यांना जर उपमुख्यमंत्री पद मिळाले तर जिल्ह्यात शिवसेनेला बुस्ट मिळण्याची शक्यता आहे. त्याचा फायदा आगामी स्थानिक स्वराज्य संस्था च्या निवडणुकीत शिवसेनेला होऊ शकतो.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम