Political News | प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांना विधानसभा निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला. बच्चू कडू हे महाशक्ती परिवर्तन आघाडीकडून निवडणुकीच्या रणांगणात उतरले होते. दरम्यान, त्यांचे कट्टर विरोधक रवी राणा हे विजयी झाले असून राणा दाम्पत्यामुळे बच्चू कडू यांचा पराभव झाला. अशी चर्चा आहे. त्यावर आता बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया देत प्रत्युत्तर दिले आहे.
अचलपूर विधानसभा मतदारसंघातून बच्चू कडू यांनी ही विधानसभा निवडणूक लढवली असून त्यामध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. राणा दाम्पत्याने ‘हमने बच्चु कडू को हिने गिराया’ असे म्हणत बच्चू कडूंच्या पराभवाचे श्रेय घेतले होते. यावर आता बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया देत राणा दापंत्यावर पलटवार केला आहे.
काय म्हणाले बच्चू कडू?
“माझ्या पराभवाचे श्रेय राणांनी घेऊ नये. या निवडणुकीत महाराष्ट्राचे चित्र वेगळे होते. आणि मी पडलो असतो तर मी त्याच श्रेय राणांना दिले असते. ते म्हणाले ‘बच्चू कडू को हमने गिराया’ पण मला पाडण्याची त्यांची औकात नाही. हिंमत असेल तर त्यांनी कोणतीही निवडणूक माझ्या विरोधात अपक्ष म्हणून लढवावी.” असे म्हणत त्यांनी राणांना आव्हान देखील दिले आहे.
रवी राणा यांनी 60 हजारांहून जास्त मताधिक्याने विजय मिळवला
वडनेर मतदार संघात रवी राणा यांनी 60 हजारांहून जास्त मते मिळवत मोठा विजय मिळवला आहे. त्यांनी शिवसेना ठाकरे गट व प्रहार जनशक्ती पक्षाच्या उमेदवारांवर मात केली आहे. राष्ट्रीय युवा स्वाभिमान पक्षाचे रवी राणा यांच्या विरोधात शिवसेना ठाकरे गटाकडून सुनील खराटे व प्रहार जनशक्ती पक्षाच्या प्रीती बंड निवडणुकीच्या रिंगणात होते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम