Ajit Pawar | ‘उद्याच्या चर्चेत अंतिम निर्णय होतील’; दिल्लीतील बैठकीबाबत अजित पवारांनी सगळंच सांगितलं

0
31
#image_title

Ajit Pawar | राज्यामध्ये सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. आज दुपारी एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केल्यामुळे देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्री पदाचा मार्ग मोकळा झाला असून उद्या दिल्लीमध्ये भाजपची पक्षश्रेष्ठीं सोबत महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. महायुतीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे अध्यक्ष अजित पवार यांनी “या बैठकीमध्ये मुख्यमंत्री पदावर शिक्कामूर्त होणार असून मंत्रिमंडळाचा पॅटर्न कसा असेल व कुठल्या महत्त्वाच्या बाबींवर चर्चा होणार आहे.” याबद्दल माहिती दिली आहे.

Ajit Pawar | ‘भाजप हा मोठा पक्ष…’; मुख्यमंत्रीपदावरून अजित पवारांच मोठ विधान!

काय म्हणाले अजित पवार? 

छत्रपती संभाजीनगर मध्ये बोलताना अजित पवार यांनी, “उद्या आम्ही तिघेजण दिल्लीला जाणार आहोत. तिथे गेल्यावर आमची बाकीची सर्व चर्चा होणार असून त्यानंतर नवीन मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्री असे सरकार बाबत निर्णय घेण्यात येईल. परंतु लगेचच नागपूरचा हिवाळी अधिवेशन असल्यामुळे पुरवणी मागण्या मंजूर करून घ्याव्या लागतील. त्यामुळे या कामाचे प्रेशर राहणार आहे. पण आम्ही बहुतेक जण अनुभवी असल्यामुळे त्यात काही अडचणी येणार नाही.” असे ते म्हणाले.

Ajit Pawar | अजित पवारांच्या अडचणींत वाढ! कोर्टाकडून हजर राहण्याचे समन्स; नेमकं प्रकरण काय…?

संसदेत जाऊन लोकसभा अध्यक्षांना पण भेट देण्याचा प्रयत्न करणार

त्याचबरोबर, “केंद्र सरकारकडून राज्यात मोठ्या प्रमाणात निधी आणण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. लोकसभेचे अधिवेशन सुरू असल्यामुळे मी संसदेत जाऊन लोकसभा अध्यक्षांना पण भेट देण्याचा प्रयत्न करणार आहे. यासंदर्भात चर्चा होऊन अतिशय खेळीमळीच्या वातावरणात चर्चा होऊन, महायुतीचे सरकार मंत्रिमंडळ याबाबत उद्याच्या चर्चेत अंतिम निर्णय घेतले जातील.” असे देखील त्यांनी यावेळी सांगितले.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here