Laxman Hake | ‘विधान परिषद नाही तर गृहमंत्री किंवा अर्थमंत्रीपद हवं’; लक्ष्मण हाकेंची युतीकडे मागणी

0
55
#image_title

Laxman Hake | विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा फडशा पाडत महायुतीने आपली सत्ता राखली. लाडकी बहीण योजनेबरोबरच, ओबीसी समाजाचा मिळालेला भरघोस पाठिंबा यामुळे महायुतीला हा ऐतिहासिक विजय प्राप्त करण्यात यश आल्याचे बोलले जाते. याच पार्श्वभूमीवर आता ओबीसी आंदोलक नेते लक्ष्मण हाके यांनी महायुतीकडे मंत्रीपदाची मागणी केली असून, “मला फक्त विधान परिषद, आमदारकी नको. तर गृह किंवा अर्थखात द्यावे” असं म्हणत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

Lakshman Hake | जरांगेसाठी ‘लाडका आंदोलक योजना’ आणा; जरांगेंच्या पाठीशी मुख्यमंत्री

नेमकं काय म्हणाले लक्ष्मण हाके? 

“मी राज्यात संख्येने अर्ध्या असणाऱ्या समाजाचे प्रतिनिधित्व करतो. त्यामुळे मला फक्त विधान परिषद नाही तर कॅबिनेट मंत्रीपद हवं आहे. गृहमंत्री, अर्थमंत्री किंवा इतर कोणतही कॅबिनेट मंत्रीपद द्यायला हवं.” असं म्हटलं आहे.

OBC Reservation | विधानसभेत या आमदारांना पाडणार..?; ओबीसी नेत्याने थेट नावं केली जाहीर

मनोज जरांगेंवर साधला निशाणा

राज्यामध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण हे मुद्दे पेटून उठले होते. यावेळी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यात यावं अशी मागणी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केली होती. यावेळी ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी त्यांना जोरदार विरोध केला होता. आता विधानसभा निवडणूक निकालानंतर देखील हाके यांनी जरांगे पाटलांवर हल्लाबोल केला असून, “मनोज जरांगेंना लोकं कंटाळले आहेत. त्यांनी 130 जागा पाडायची भाषा केली होती. जिथे उमेदवार पाडण्यासाठी मेसेज दिला, तिथले उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून आले आहेत.” असं म्हणत जरांगेंवर जोरदार निशाणा साधला.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here