Bachhu Kadu | तिसऱ्या आघाडीचे सर्वेसर्वा बच्चू कडुंना पराभवाचा फटका!

0
87
#image_title

Bachhu Kadu | राज्यामध्ये 288 जागांसाठी विधानसभा निवडणुकांचे निकाल आता हाती आले असून सुरुवातीचे कल पाहता महायुतीला राज्यात मोठे यश मिळताना दिसले आहे. तर तिसरी आघाडी म्हणून निवडणुकीच्या रणसंग्रामात उतरलेले बच्चू कडू यांना पराभवाचा धक्का बसला आहे. बच्चू कडू हे अचलपूर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी करत होते.

Bachhu kadu | अन् संतापलेल्या आमदार बच्चू कडू यांनी थेट अधिकाऱ्याच्या कानशि‍लात लगावली

संभाजी छत्रपती व राजू शेट्टी यांना सोबत घेत बच्चू कडू यांनी तिसऱ्या आघाडीची स्थापना केली. त्यानुसार या आघाडीने आपले उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उतरवले. त्यामुळे या आघाडीचा निकाल काय लागणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. तर बच्चू कडूंनी अचलपूर विधानसभा मतदारसंघात उमेदवारी केली असून यावेळी महायुतीचे प्रवीण वसंतराव तायडे यांचे त्यांना आव्हान होते. तर महाविकास आघाडीतील बाबलूभाऊ सुभानराव देशमुख हे देखील निवडणुकीच्या रिंगणात होते.

Bachhu kadu : आमदार बच्चूंंनी अखेर घेतला “कडू” निर्णय

2019 मध्ये अचलपूरची जागा जिंकली होती

2019 साली विधानसभा निवडणूक निकालात अचलपूरची जागा पीएचजेएसपीचे बच्चू बाबाराव कडू यांनी जिंकली होती. 2019 साली विधानसभेची निवडणूक त्यांनी पहिल्यांदाच अपक्ष म्हणून लढवली होती. त्यावेळी त्यांचा 1300 मतांनी पराभव झाला होता. आमदार झाल्यानंतर बच्चू कडू यांनी ‘प्रहार जनशक्ती पक्ष’ या संघटनेची स्थापना केली. अपंग, शेतकरी व गरिबांच्या न्याय हक्कासाठी झटणे हे या संघटनेचे मुख्य उद्दिष्ट आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here