Maharashtra Board | दहावी-बारावीच्या लेखी परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर

0
56
#image_title

Maharashtra Board | शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी मार्च 2025 मध्ये होणाऱ्या दहावी बारावीच्या लेखी परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. यापूर्वी जाहीर केल्याप्रमाणे यावर्षी दहावी-बारावीची परीक्षा दरवर्षीच्या तुलनेत लवकर होणार असून त्यानुसार, बारावीच्या परीक्षा 11 फेब्रुवारीपासून तर दहावीची परीक्षा 21 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे.

Maharashtra HSC 12 Results | राज्यात बारावीचा निकाल ९३.३७ टक्के; यंदाही मुलींनीच मारली बाजी

अंतिम वेळापत्रक मंडळाच्या ‘www.mahahsscboard.in’ या संकेतस्थळावर उपलब्ध

छत्रपती संभाजी नगर, पुणे, नागपूर, मुंबई, अमरावती, कोल्हापूरौं लातूर नाशिक व कोकण या नऊ विभागीय मंडळातर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या दहावी-बारावीच्या लेखी परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर यापूर्वीच उपलब्ध करून देण्यात आले होते. या परीक्षांचे अंतिम वेळापत्रक मंडळाच्या ‘www.mahahsscboard.in’ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. मंडळाच्या संकेतस्थळावरील उपलब्ध वेळापत्रकांची सुविधा फक्त माहितीसाठी असून परीक्षेपूर्वी माध्यमाध्यमिक, उच्च माध्यमिक, शाळा कनिष्ठ महाविद्यालय यांच्याकडे छापील स्वरूपात दिले जाणारे वेळापत्रक अंतिम असणार आहे. या छापील वेळापत्रकावरूनच परीक्षेच्या तारखांची खात्री करून घेत विद्यार्थ्यांनी त्यानुसार, परीक्षेत प्रविष्ट राहावे. अन्य कोणत्याही संकेतस्थळावरील किंवा अन्य यंत्रणेने छपाई केलेले त्याचबरोबर व्हाट्सअप किंवा तत्सम माध्यमातून व्हायरल झालेले वेळापत्रक विद्यार्थ्यांनी ग्राह्य धरू नये. असे राज्य मंडळाचे सचिव देविदास कुलाळ यांनी सांगितले आहे.

तसेच इयत्ता बारावीची प्रात्यक्षिक श्रेणी तोंडी व अंतर्गत मूल्यमापन त्याचबरोबर एनएसक्यूएफ अंतर्गत व्यावसायिक अभ्यासक्रम प्रात्यक्षिक परीक्षा 24 जानेवारी ते 10 फेब्रुवारी दरम्यान होणार आहे त्याचबरोबर दहावीची प्रात्यक्षिक श्रेणी तोंडी परीक्षा व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा 3 ते 20 फेब्रुवारी दरम्यान घेतली जाणार आहे.

Maharashtra Board Result 2023: 10वी आणि 12वीचे निकाल कधी होणार जाहीर, काय आहे अपडेट ? वाचा

दहावी-बारावी वेळापत्रक

* 11 फेब्रुवारी ते 18 मार्च 2025 – (बारावी सर्वसाधारण द्विलक्षी व्यवसाय अभ्यासक्रम लेखी परीक्षा)

* 24 जानेवारी ते 10 फेब्रुवारी 2025 – बारावी (तोंडी श्रेणी प्रात्यक्षिक व अंतर्गत मूल्यमापन तसेच एनएसक्यूएफ अंतर्गत व्यावसायिक अभ्यासक्रम प्रात्यक्षिक परीक्षा)

* 21 फेब्रुवारी ते 17 मार्च 2025 – दहावी (लेखी परीक्षा)

* 3 फेब्रुवारी ते 20 फेब्रुवारी 2025 – दहावी (तोंडी परीक्षा श्रेणी प्रात्यक्षिक व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा)


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here