Pune Crime | पुण्यामध्ये नववीच्या विद्यार्थ्याने वर्गातील दुसऱ्या मुलाला काचेच्या तुकड्याने गळा चिरत हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना पुण्यातील मांजरी परिसरात घडली असून सदरप्रकरणी हडपसर पोलिसांमध्ये अल्पवयीन मुलाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
Pune Crime | धडाधड पाच गोळ्या घालत केला १० वर्षांच्या प्रेमाचा थरारक शेवट
‘मी तुझी विकेट पाडीन’ म्हणत दिली धमकी
या घटनेत अल्पवयीन मुलगा गंभीर जखमी झाला असून फिर्यादी मुलगा मांजरी परिसरातील एका शाळेत नववीच्या वर्गात शिकत आहे. शाळेतील वार्षिक समारंभावरून त्याचा दुसऱ्या विद्यार्थ्यासोबत शाब्दिक वाद झाला होता. फिर्यादी मुलगा मंगळवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास वर्गात बसला होता. त्यावेळी त्याच वर्गातील दुसऱ्या 14 वर्षीय मुलाने पाठीमागून त्याच्यावर वार करत, मुलाच्या गळ्यावरून काचेचा तुकडा फिरवला. तसेच हल्ला करणाऱ्या मुलाने जखमी मुलाला ‘मी तुझी विकेट पाडीन’ अशी धमकीही दिली. या घटनेमुळे वर्गातील इतर मुलांमध्ये भीतीदायक वातावरण होते.
Pune Crime | विदेशातून ऑनलाइन माध्यमातून वेश्या व्यवसाय; आरोपी अभिनेत्री ताब्यात
खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी फिर्याद दाखल
दरम्यान, शाळेतील शिक्षक व कर्मचाऱ्यांनी जखमी विद्यार्थ्याला खाजगी रुग्णालयात दाखल नेले असून या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे घटनास्थळी दाखल झाले होते. या प्रकरणी जखमी मुलाने दुसऱ्या दिवशी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून हल्लेखोर मुलाविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी करण्यात आला आहे. पोलिसांनी हल्ला केलेल्या मुलाला ताब्यात घेतले असून सहाय्यक निरीक्षक दादासाहेब रोकडे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम