Political News | विधानसभा निवडणूक 2024 साठी आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी सकाळी 7 वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली आहे. मतदान करण्यासाठी मतदारांनी मतदान केंद्रावर गर्दी केली असून नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागातील मतदारांमध्ये मतदानासाठी उत्साह दिसून येत आहे. अशातच नांदगाव जिल्ह्यातील नांदगाव विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार समीर भुजबळ व शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार सुहास कांदे यांच्या गटात जोरदार राडा झाल्याची माहिती समोर आली आहे.
Political News | ‘बविआ’चा उमेदवार फुटला?; सहा तास राडा घालून अखेर हितेंद्र ठाकूर तावडेंसोबत रवाना
नेमके काय घडले?
उपलब्ध माहितीनुसार, सुहास कांदेंकडून बोलावण्यात आलेल्या मतदारांना समीर भुजबळ यांनी अडवले. यानंतर समीर भुजबळ आणि सुहास कांदे आमने-सामने आले. नांदगाव-मनमाड रस्त्यावरती हा प्रकार घडल्याचे बोलले जात असून हे मतदार गुरुकुल कॉलेज परिसरातून मतदानाला निघाले होते. यावेळी समीर भुजबळांनी गाड्या आडव्या लावत मतदारांना अडवल्यामुळे हा राडा झाल्याची माहिती आहे. त्यामुळे नांदगावमध्ये राजकीय वातावरण तापले चांगलेच असून पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे.
कांदेकडून समीर भुजबळांना जिवे मारण्याची धमकी
यावेळी सुहास कांदे यांच्याकडून समीर भुजबळांना जीवे मारण्याची धमकी धमकी देण्यात आली आहे. ‘आज तुझा मर्डर फिक्स आहे’ असं म्हणत सुहास कांदेंनी समीर भुजबळांना खुले आम धमकी दिली आहे. या प्रकरणामुळे नांदगाव विधानसभा मतदारसंघात खळबळ उडाली असून पोलिसांकडून दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांची समजून काढण्याचा प्रयत्न करण्यात आला.
ईव्हीएम मशीन बंद पडल्याने मतदारांचा खोळंबा
दरम्यान, नांदगाव मतदारसंघातील 164 मतदान केंद्रांवरील ईव्हीएम मशीन दोन वेळा बंद पडले होते. न्यू इंग्लिश स्कूल येथे मतदान केंद्रावर हा प्रकार घडला. मतदारांना तब्बल दोन तास मतदानासाठी ताटकळत उभे राहावे लागल्याचे यावेळी दिसून आले.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम