Political News | विधानसभा निवडणुकीसाठी उद्या मतदान प्रक्रिया पार पडणार असून त्याआधी राजकीय घडामोडींना वेग आला आहे. बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून भाजपचे ज्येष्ठ नेते विनोद तावडे पैसे वाटप करत असल्याचा आरोप करण्यात आला. यावेळी तावडेंना बविआच्या कार्यकर्त्यांनी विरारच्या विवांत हॉटेल बाहेर आरोप करत घेरले होते.
भाजप-बविआ कार्यकर्ते आमने-सामने
बविआच्या कार्यकर्त्यांकडून तावडेंवर गंभीर आरोप करण्यात आले असून विनोद तावडे विरारपूर्व मधील विवाद हॉटेलमध्ये पाच कोटी घेऊन आले आहेत अशी माहिती बविआच्या कार्यकर्त्यांना लागताच, त्यांनी हॉटेलवर धाव घेतली. यावेळी भाजप कार्यकर्ते आणि बविआ कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. विनोद तावडे आज विरार पूर्व मधील विवांत हॉटेलमध्ये आले होते. यावेळी भाजपचे उमेदवार राजन नाईक आणि भाजपाचे काही पदाधिकारी यांच्यात बैठक सुरू होती. तेव्हाच बविआचे काही कार्यकर्ते हॉटेलमध्ये आले व या ठिकाणी पैसे वाटप सुरू असल्याचा आरोप करत राडा घातला. या राड्यानंतर पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. यावेळी क्षितिज ठाकूर देखील घटनास्थळी उपस्थित होते.
कारवाई शिवाय सोडणार नाही क्षितिज ठाकूरांचा इशारा
दरम्यान, भाजपकडून विनोद तावडेंवर करण्यात आलेले आरोप फेटाळण्यात आले असून ‘कारवाई शिवाय सोडणार नाही.’ असा इशारा क्षितिष ठाकूर यांनी दिला आहे. तर भाजप सत्तेचा गैरवापर करत असल्याचा आरोप महाविकास आघाडीकडून करण्यात आला.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम