Nashik Crime | निवडणूक आयोगाकडून नाशकात मोठी कारवाई; नामांकित हॉटेलातून कोट्यावधींची रक्कम हस्तगत

0
51
#image_title

Nashik Crime | विधानसभा निवडणूक 2024 च्या मतदानाची प्रक्रिया 20 नोव्हेंबर रोजी पार पडणार असून 23 नोव्हेंबर रोजी निकाल लागणार आहे. आज प्रचाराचा शेवटचा दिवस असून या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून धडक कारवाया केल्या जात आहेत. अशातच निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाकडून नाशिकमध्ये मोठी कारवाई करण्यात आली असून नाशिक मधील एका नामांकित हॉटेलमध्ये पाच कोटीं पेक्षा जास्त रक्कम सापडली आहे. यावेळी राजकीय पक्षाच्या नेत्यासह गाडी जप्त करण्यात आली आहे.

Nashik Crime | राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून सलग दोन कारवाया; अवैध मद्यसाठ्यासह एकूण 19 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

नामांकित हॉटेलात सापडली कोट्यावधींची रक्कम

विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची सांगता आज होणार असून यादरम्यान, या घटनेमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. नाशिकच्या पाथर्डी फाटा परिसरातील एका नामांकित हॉटेलमध्ये निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाकडून सकाळच्या सुमारास कारवाई करण्यात आली. यावेळी कारवाईत कोट्यावधींची रक्कम हाती लागली असून ही रक्कम नेमकी कोणाची आहे? पोलिसांनी ताब्यात घेतलेला नेता कोणत्या राजकीय पक्षाचा आहे? याबद्दल माहिती मिळाली नसून या प्रकरणाकडे आता सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here