Nashik Crime | राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून सलग दोन कारवाया; अवैध मद्यसाठ्यासह एकूण 19 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

0
41
#image_title

Nashik Crime | राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने पाथर्डी फाटा रोडवरून वडनेरच्या दिशेने जाणाऱ्या कारमधून अवैध मध्ये साठा जप्त केला आहे. या कारवाईत कारसह 8 लाख 33 हजारांचा विदेशी मद्यसाठा असलेला मुद्देमाल जप्त करण्यात आला असून राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अध्यक्ष शशिकांत गर्जे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाकडून ही कारवाई करण्यात आली आहे.

Nashik Crime | घरबसल्या पैसे कमावण्याचे आमिष दाखवत सायबर भामट्यांनी 73 लाख उकळले!

गोव्याला विक्रीसाठी मान्यता असलेला मद्य साठा जप्त

राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे अवैध विदेशी मद्याची वाहतूक होणार असल्याची टिप मिळाली होती. यानंतर ही कारवाई करण्यात आली असून एम.एच.16 बीसी 1830 नंबर प्लेटची संशयीत कार पथकाकडून थांबवण्यात आली. यावेळी कारचालकाने वाहन रस्त्यात लावून पळ काढण्याचा प्रयत्न केला. वाहन तपासले असता, त्यात केवळ गोव्याला विक्रीसाठी मान्यता असलेला मद्य साठा आढळून आला असून याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

आतापर्यंत 29 लाख 32 हजार 425 रुपयांचा हस्तगत

राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक बाळासाहेब पाटील, सहाय्यक निरीक्षक सोनाली चंद्रमोरे, दुय्यम निरीक्षक प्रवीण देशमुख, राहुल जगताप, भूषण वाणी, जवान सुनील दिघोळे, तुषार महाजन, भालचंद्र वाघ व वाहन चालक वीरेंद्र वाघ यांच्या पथकाने ही कारवाई केली असून विभागाकडून आतापर्यंत 10 ते 16 तारखेपर्यंत एकूण 14 गुन्हे नोंद करण्यात आले असून त्यात चार 4 चाकी वाहने. त्याचबरोबर 3 दुचाकी वाहनांसोबत गोवा तसेच महाराष्ट्रातील देश-विदेशी मद्याचे एकूण 78 बॉक्स व 600 लिटर गावठीसाठा हस्तगत करण्यात आला आहे. या एकूण मुद्देमालाची किंमत 29 लाख 32 हजार 425 रुपये इतकी आहे.

Nashik Crime | उपनगर पोलिसांकडून जेलरोड परीसरात छापेमारी; साडेसात लाखांचा मद्यसाठा जप्त

नाशिक-आग्रा महामार्गावरही विभागाची कारवाई

याचबरोबर, नाशिक-आग्रा महामार्गाच्या सर्विस रोडवरील हॉटेल ‘काका का ढाबा’ समोर शाळेच्या बसमधून अकरा लाख व मद्यसाठा असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक शशिकांत गर्जे यांना अवैधरित्या विदेशी मद्याची वाहतूक केली जात असल्याची टिप मिळाली होती. या माहितीच्या आधारावर सापळा रचत विभागाकडून ही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत 480 सीलबंद बाटल्या असलेले 20 विदेशी मद्याचे बॉक्स आढळून आले असून 11 लाख 53 हजार 600 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. संशयित वाहन चालक अजिताब सारंग याला चौकशीसाठी ताब्यात घेत गुणात आला असून वाहनासह विदेशी मद्य साठा हस्तगत करण्यात आला आहे. निरीक्षक आर. जे. पाटील, गणपत अहिरराव, दुय्यम निरीक्षक धीरज जाधव, जवान अमित गांगुर्डे, प्रवीण वाघ, संतोष कडलग विष्णू सानप, दुर्गादास बावस्कर, राकेश पगारे, महेंद्र भोये यांच्या पथकाने ही कारवाई बजावली आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here