Nashik News | अंबड पोलिसांकडून सिडकोतील राड्याप्रकरणी शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांविरोधात कारवाई करण्यात आली असून यावरून नाशिक पश्चिम मधील उमेदवार सुधाकर बडगुजर यांनी समर्थकांसह अंबड पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन केले आहे. सदरप्रकरणी अंबड पोलिसात जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी बडगुजर यांच्यासह 50 समर्थकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Nashik News | नाशकात मल्लिकार्जुन खरगेंच्या सभेत मंडप उडाल्याने गोंधळ; दोन कार्यकर्ते जखमी
नेमके प्रकरण काय?
शुक्रवार दिनांक 15 नोव्हेंबर रोजी सिडकोतील सावतानगर येथील हिरे शाळेजवळ शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार सुधाकर बडगुजर यांच्या समर्थकांनी मतदारांना चिठ्ठ्या वाटप करण्यात आल्या, यावेळी भाजपच्या उमेदवार सीमा हिरे यांचे समर्थक नगरसेवक मुकेश शहाणे व समर्थकांनी घटनास्थळी पोहोचत बडगुजर समर्थकांना पैसे वाटप केल्याचा आरोप केला. यातून दोन्ही गटात बाचाबाची होत प्रकरण मारामारी पर्यंत पोहोचले. प्रवीण चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, बडगुजर समर्थक सुमित पगारे, सद्दाम शेख, अनिकेत शिरसाठ, मयुरेश बडगुजर, बाळा निकम, यांच्यासह 35 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी बडगुजर समर्थकांसह हिरे समर्थक शहाणे व साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करत बडगुजर व समर्थकांकडून अंबड पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन करण्यात आले.
Nashik News | नाशकात युती व आघाडीतील वाद चिघळला, कार्यकर्त्यांमध्ये राडा; सुप्रिया सुळेंची सभा रद्द
बडगुजरांसह 50 समर्थकांवर गुन्हा दाखल
यावेळी सद्दाम शेख यांच्या फिर्यादीनुसार, गुन्हा दाखल करण्यात आला असून बडगुजर यांनी विनापरवानगी पोलीस ठाण्यात जमाव बंदी करून आंदोलन केल्याप्रकरणी हवालदार जितेंद्र परदेशी यांच्या फिर्यादीनुसार, बडगुजर व 50 समर्थकांविरोधात जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी कोणा नोंदविण्यात आला आहे. याप्रकरणी वरिष्ठ निरीक्षक सुनील पवार तपास करीत आहेत.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम