Nashik News | विधानसभा निवडणूक 2024 साठी महाविकास आघाडी व महायुतीकडून जोरदार तयारी सुरू असून आज इगतपुरी-त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार लकी जाधव यांच्या प्रचाराकरिता काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी सभेचा मंडप अचानक उडाल्याने दोन कार्यकर्ते जखमी झाल्याची माहिती आता समोर आली आहे.
Nashik News | नाशकात युती व आघाडीतील वाद चिघळला, कार्यकर्त्यांमध्ये राडा; सुप्रिया सुळेंची सभा रद्द
लकी जाधव यांच्या प्रचाराकरिता सभेचे आयोजन
इगतपुरी-त्र्यंबकेश्वर मतदारसंघ हा अनुसूचित जमातींसाठी राखीव मतदारसंघ असून या मतदारसंघातून 2019 च्या निवडणुकीत काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आलेले विद्यमान आमदार हिरामण खोसकर यांनी काँग्रेसला सोडचिट्ठी देत अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. यानंतर हिरामण खोसकर यांना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली व महाविकास आघाडीकडून काँग्रेसने लकी जाधव यांना उमेदवारी जाहीर केली.
Nashik News | नाशकात लाचलुचपत विभागाची लष्कराच्या सीडीए कार्यालयावर छापेमारी
मंडपाचे छत उडाल्यामुळे दोनजण जखमी
विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराकरिता काहीच दिवस शिल्लक असल्याकारणाने राजकीय घडामोडींना वेग आले असून लकी जाधव यांच्या प्रचाराकरिता आज काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेसाठी उभारलेला मंडप वादळामुळे अचानक उडाला. यावेळी सभामंडप उडाल्यामुळे दोन कार्यकर्ते किरकोळ जखमी झाले असून यामुळे सभास्थळात गोंधळ उडाला होता. तर यामुळे हेलिपॅड वरून निघालेल्या मल्लिकार्जुन खरगे यांचा ताफा पुन्हा माघारी परतला. त्यानंतर मल्लिकार्जुन खरगे पुन्हा सभास्थळी दाखल झाले.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम