द पॉईंट नाऊ प्रतिनिधी : कोरोनाच्या नवीन प्रकार ओमीक्रॉनच्या वाढत्या प्रभावाच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्हा प्रशासनाने निर्णय घेतला आहे. ज्यांनी कोणी लस घेतल्या नाहीत, अशांना आता सार्वजनिक ठिकाणी फिरता येणार नाही.
नाशिक जिल्ह्याचे पालक मंत्री छगन भुजबळ यांनी नुकतीच कोरोना बाबत आढावा बैठक घेतली. ज्यात विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. जिल्हा प्रशासनाने घेतलेला हा निर्णय येत्या 23 डिसेंबर पासून लागू होणार आहे.
देशभरात कोविड लसीकरण आकडा जरी 127 कोटींच्या पुढे पोहोचला असला, तरीही अद्याप लस न घेतलेल्या अथवा लस घेण्यास टाळाटाळ करणाऱ्या लोकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे.
लस न घेतल्याने कोरोनाचा प्रभाव अधिक वाढण्याची शक्यता आहे. नुकतेच आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी राज्यात फेब्रुवारी महिन्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे कोरोनाच्या वाढत्या प्रभावाला आळा घालण्यासाठी लसीकरण हाच एक पर्याय आहे.
नागरिकांना शासनाद्वारे वारंवार लसीकरण करून घेण्यासाठी सूचना केल्या जात आहेत. मात्र नागरिक गांभीर्य ओळखून वागायला तयार नाहीत. त्यामुळे आता नाशिक मध्ये जिल्हा प्रशासनाने नागरिकांना एक आठवड्याचा वेळ देऊ केला आहे. ज्यात नागरिकांनी लसीकरण करून घेणे आवश्यक आहे. असे न झाल्यास संबंधित नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी फिरता येणार नाही.
सर्व प्रकारच्या सार्वजनिक आस्थापना ठिकाणी हा नियम लागू असणार आहे. आणि यात जर एखाद्या आस्थापणेच्या ठिकाणी लसीकरण न करून घेतलेले नागरिक आढळले. तर संबंधित आस्थापणेला जबाबदार धरून कारवाई केली जाणार आहे.
जगभरात कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. ज्यामुळे पुन्हा वेगवेगळ्या ठिकाणी निर्बंध लागू केले जात आहेत. भारतात लसीकरण करून न घेतलेल्या लोकांची संख्या अजूनही मोठी आहे.त्यामुळे आता प्रशासन अधिक कडक पाऊले उचलू लागले आहे.
शासनाद्वारे अनेक प्रकारे प्रबोधन करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र नागरिक वर्ग त्यास जुमाणण्यास तयार नाही. त्यात आता तर नागरिक कोरोना गेलाच आहे. अशा आविर्भावात वागतांना दिसून येत आहेत. नागरिक कोरोनाचे निर्बंध झुगारून सार्वजनिक ठिकाणी वावरतांना दिसत आहेत. त्यामुळे प्रशासन आता पुन्हा कडक निर्णय घेण्याच्या तयारीत आहे.
नाशिक जिल्हा प्रशासनाने देखील अशाच प्रकारे कडक पाऊले उचलत हा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आता नाशिककर प्रशासनाच्या या निर्णयाला जुमानतात का? प्रशासनाच्या या निर्णयाचा नागरिकांवर काही परिणाम होतो का? हर नागरिकच जाणोत.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम