Political News | राज्यात निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली असून राज्यभरात प्रचार आणि सभांचा धुरळा उडाला आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ताफा राज्याच्या दौऱ्यावर होता. त्यांनी आज उत्तर महाराष्ट्रातील धुळे आणि नाशिक या ठिकाणी सभा घेतली तर यादरम्यान, अमित शहांनी देखील सांगली जिल्ह्यातील शिराळ येथे पहिली जाहीर सभा घेतली. या सभेमध्ये अमित शहा यांनी महाविकास आघाडीवर जोरदार निशाणा साधला. यावेळी भाषणादरम्यान, अमित शहा यांनी, “छत्रपती शिवाजी महाराजांनी रामदास स्वामी यांच्या बद्दल एक वक्तव्य केले आहे. या वक्तव्यावरून नवा राजकीय वाद उफाळून आला असून यावरून माजी खासदार संभाजी राजे छत्रपती यांनी आक्षेप घेतला आहे.
Political News | ‘लोकसभेत केलेल्या प्रचाराची परत फेड करणार नाही’; रक्षा खडसेंनी केली भुमिका स्पष्ट
अमित शहांच्या वक्तव्यावरून नवा वाद
अमित शहांनी केलेल्या या वक्तव्यावरून आता आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. मंत्री अमित शहा यांनी “समर्थ रामदास यांचे चरण ज्या ठिकाणी पडले, ती ही भूमी आहे. गुलामी काळात रामदास स्वामिंनी तरुणांना एकत्र करून शिवाजी महाराजांना पाठिंबा देण्याचे काम केले.” असे वक्तव्य केले होते. या वक्तव्यावर आता संभाजीराजे छत्रपती यांनी अक्षय घेतला आहे.
काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती?
“छत्रपती शिवाजी महाराज आणि संत रामदास यांना जर तुम्ही जोडलं, किंवा त्यांना कोण गुरु म्हणत आहेत. तर तसे होऊ शकत नाही. शिवाजी महाराज्यांच्या एकच गुरु आहेत. त्या म्हणजे जिजाऊ मासाहेब. त्यांच्या महत्त्वाला आम्ही चॅलेंज करत नाही. पण कुठलाही संदर्भ शिवाजी महाराजांना जोडणे हे न पटणार आहे.” असं सांगत माजी खासदार संभाजी राजे यांनी आक्षेप घेतला आहे.
अमोल मिटकरी यांनी ही ट्विट करत घेतला आक्षेप
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार अमोल मिटकरी यांनी ही केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या वक्तव्यावर आक्षेप घेतला आहे. आमदार मिटकरी यांनी ट्विट करून टीका केली आहे. “सांगलीतल्या सभेत मंत्री अमित शहा यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाबद्दल केलेले वक्तव्य चुकीचे असून महाराष्ट्रात त्यांना स्क्रिप्ट कोणी लिहून दिली हे शोधले पाहिजे. बाहेरून येणाऱ्यांनी शिवचरित्राचा अभ्यास केल्याशिवाय त्या विषयावर बोलू नये असा सल्लाही त्यांच्याकडून यावेळी देण्यात आला आहे.
संभाजी ब्रिगेडकडून खुले आव्हान
“काही इतिहासकार शिवरायांच्या महानतेला कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत अमित शहा यांनी जर महाराष्ट्राचा इतिहास समजून घेतला नाही. तर त्यांनी इतिहासावर बोलू नये. त्यांनी आधी छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा इतिहास वाचावा आणि त्यावर आधारित माहिती द्यावी. शिवराय व रामदास यांची भेट कुठे झाली? याबद्दल अमित शहांना कोणतीही ठोस माहिती असल्यास त्यांनी ती सर्वांसमोर मांडावी असे म्हणत,” संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते संतोष शिंदे यांनी अमित शहांना खुले आव्हान दिले आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम