Dada Bhuse | मालेगाव बाह्य मतदार संघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार दादा भुसे यांनी आज दि पाच नोव्हेंबर 2024 रोजी मालेगाव सह संपूर्ण नाशिक जिल्ह्याचे आराध्य दैवत असलेल्या चंदनपुरी येथील खंडेराव महाराज मंदिरात नारळ वाढवून आपल्या प्रचाराचा शुभारंभ केला आहे याप्रसंगी त्यांना पाठिंबा देण्याकरिता महायुतीतील सर्व घटक पक्षातील पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी बोलताना त्यांनी विरोधकांना चांगलेच धारेवर धरले.
Dada Bhuse | मालेगावच्या सभेत दादा भुसे कडाडले; ‘येडं पायडू’ म्हणत हिरेंना ललकारले
दादा भुसे यांचा विरोधकांवर निशाणा
यावेळी बोलताना दादा भुसे यांनी विरोधकांवर तोफ डागत अनेक गौप्यस्फोट केले. “काही लोक म्हणतात मी होतो म्हणून असं झालं, मी होतो म्हणून तसं झालं. मग हे बाकीचे कोण होते. त्यांचं काही योगदान नाही का..? हा मी पणा, गर्व आहे आणि गर्वाचे घर हे नेहमी खाली असते. या मालेगावचे नाव आपण सर्वांनी मिळूनसर्वांनी परिश्रम घेऊन मोठे केले आहे. यात आपल्या सर्वांचे योगदान आहे.”
ज्येष्ठांचा आदर म्हणून शांत आहे. नाहीतर….
“ज्या बँकेतून शेतकऱ्यांना कर्ज मिळायचे त्यात अनेक ठेवीदारांनी आपली आयुष्यभराची कमाई ठेवली होती. तिथे यांनी १ कोटीच्या प्रॉपर्टीवर साडे सात कोटी रुपयांचे कर्ज काढले आणि परतफेड केली नाही आणि बँकेने कारवाई केली तर दादा भूसेने केली. आणि काही लोकांना तर लाज वाटायला पाहिजे. ते जेलमधून बाहेर आल्यावर असे स्वागत करतात जसे लढाईवर गेले होते. त्या दोन्ही संस्थांवर ज्येष्ठ नेत्या पुष्पाताई हिरे यांचे नाव ट्रस्टीमध्ये आहे. स्मिता हिरे यांचेही नाव आहे. महिला भगिनी आणि ज्येष्ठांचा आदर म्हणून शांत आहे. नाहीतर त्यामुळे सात ते आठ दिवसांचा विषय आहे” असे म्हणत भुसे यांनी विरोधकांना ललकारले.
गरीब मुलांच्या खांद्यावर बंदूक ठेवून गैरव्यवहार कोण करतयं?
नाशिक मर्चंट बँक मालेगाव शाखा येथे काही गरीब मुलांच्या नावाने खाते खोलुन काही दिवसांतच त्या खात्यांवरून कोटींच्या पुढचे व्यवहार झाले आहेत. हा पैसा कुठून आला..? कोणाचा आहे..? या गरीब मुलांच्या खांद्यावर बंदूक ठेऊन कोण हे सर्व करत आहे..? याची चौकशी मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामार्फत लावणार असल्याचे यावेळी भुसे म्हणाले.
Dada Bhuse | दादा भूसेंना आशीर्वाद देण्यासाठी लाखोंचा जनसागर रस्त्यावर
अफवांवरती विश्वास ठेवू नये दादा भुसे यांचे आवाहन
“तुम्ही त्या दिवशी माझ्या वडिलांचा अपमान केला. पातळी सोडून टिका केली. मी ऐकून घेतलं. मात्र, त्याऐवजी जर तुम्ही माझ्या एखाद्या कार्यकर्त्याच्या वडिलांचा अपमान केला असता तर तुम्हाला सांगितलं असतं की, दादागिरी कशाला म्हणतात. कोणी एक तर म्हणे दादा भुसेची नाशिक, मुंबई आणि दुबईमध्येही प्रॉपर्टी आहे. अरे जरा पटेल असं तरी खोटं बोला. जसजशी २० तारीख जवळ येईल तसं अफवा पसरतील. त्यावर विश्वास ठेऊ नका” असे आवाहनही यावेळी त्यांनी उपस्थितांना केली.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम