Political News | कागलमध्ये मुश्रीफ-घाटगे समर्थक आमने-सामने; एकमेकांची कॉलर पकडत जोरदार हाणामारी

0
65
#image_title

Political News | विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात वातावरण तापले आहे. त्यात कागलमध्ये राष्ट्रवादीच्या दोन गटात थेट लढत असून इथे हसन मुश्रीफ विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून समरजीत सिंहघाटगे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर आज एका खाजगी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमादरम्यान कागलमध्ये मुश्रीफ आणि घाटगे समर्थक आमने-सामने आले असून कार्यकर्त्यांनी कॉलर पकडून हाणामारी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

Political News | मनसेच्या माजी जिल्हाध्यक्ष दिलीप दातीरांनी दिला राजीनामा; उमेदवारी न मिळाल्याने होते नाराज

कागलमध्ये दोन गटात हाणामारी

कागलमध्ये एबीपी माझा या वृत्तवाहिनीने “मुद्द्याचं बोला” हा कार्यक्रम आयोजित केला असता यावेळी हसन मुश्रीफ आणि समरजित घाटगे समर्थक आपापले मुद्दे मांडत होते. परंतु काही मुद्द्यांवरून या दोन्ही गटात वाद झाल्याने हा वाद विकोपाला जात दोन्ही गटाचे कार्यकर्ते एकमेकांच्या आमने-सामने आले. यावेळी समर्थकांमध्ये जोरदार हाणामारी सुरू झाली. दोन्ही बाजूचे कार्यकर्ते एकमेकांवर धावून गेले. यानंतर एकमेकांची कॉलर पकडून कार्यकर्त्यांनी हाणामारी सुरू केली. यात रस्त्याकडेला पार्किंग असणाऱ्या अनेक दुचाकी देखील खाली पडल्या.

पोलिसांकडून परिस्थिती नियंत्रणात

या कार्यक्रमाचे निवेदन करणारे “अभिनेते पंढरीनाथ कांबळे” यांनी कार्यकर्त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. परंतु कुणीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. एकमेकांची कॉलर पकडून दगडफेक करण्यापर्यंत हा वाद विकोपाला गेला. सुरुवातीची 12 मिनिटे हा कार्यक्रम व्यवस्थित पार पडला नागरिक त्यांचे मुद्दे व्यवस्थित मांडत होते. परंतु शांततेत सुरू असणाऱ्या कार्यक्रमात दोन्ही गटाकडून घोषणाबाजी झाली. त्यात कार्यकर्ते एकमेकांच्या अंगावर धावून गेले. या कार्यक्रमाजवळ इमारतीचे बांधकाम सुरू होते. त्या ठिकाणी असलेल्या विटा कार्यकर्ते एकमेकांवर मारत होते. त्यानंतर या घटनेची माहिती पोलिसांना लागताच ते घटनास्थळी हजर झाले व गोंधळ नियंत्रणात आणला.

Nashik Political | नाशिकमध्ये काँग्रेसला एक ही जागा न मिळाल्याने काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी ठोकले काँग्रेस कार्यालयाला टाळे..

कागलमध्ये घाटगे आणि मुश्रीफ यांच्यात लढत 

हसन मुश्रीफ यांना अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. तर आपल्याला तिकीट मिळणार नाही यामुळे भाजपचे समरजिततसिंह घाटगे यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. तर राष्ट्रवादीकडून सरजितसिंह घाटगे यांना विधानसभेची उमेदवारी मिळाली आहे. त्यामुळे कागलमध्ये हसन मुर्शिफ आणि समरजीत सिंह घाटगे यांच्यात येत्या विधानसभेला लढत पाहायला मिळणार आहे. परंतु प्रचाराच्या सुरुवातीपासूनच कागलमध्ये संघर्ष सुरू झाल्याने आगामी काळात तणावाची स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here