Nashik News | वाहतुकीच्या नियमांचे पालन न करणाऱ्या खाजगी प्रवासी वाहनांवर प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून दंडात्मक कारवाई केली जाते. आर्थिक वर्ष 1 एप्रिल 2023 ते 31 मार्च 2024 व 1 एप्रिल 2024 ते 30 सप्टेंबर 2024 च्या दीड वर्षाच्या कालावधीत 5,407 खाजगी प्रवासी बस चालकांना दणका देत वाहन चालकांकडून 1 कोटी 51 लाख 6 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
या वर्षी 36 लाख सहा हजार रुपये दंड वसूल
प्रादेशिक परिवहन अधिकारी नाशिक यांच्या निर्देशाप्रमाणे प्रवासी बस विशेष तपासणी मोहीम सुरू असते. यामध्ये खाजगी प्रवासी व तपासणी मोहिमेत आर्थिक वर्ष 1 एप्रिल 2023 ते 31 मार्च 2024 पर्यंत 8,208 वाहनांची तपासणी करण्यात आली असून या तपासणी 3,967 वाहने हे दोष आढळली आहेत. या दोषी प्रवासी वाहन चालकांकडून 1 कोटी 15 लाख रुपये दंडवसूल करण्यात आला असून 1 एप्रिल 2024 ते 30 सप्टेंबर 2024 पर्यंत 93 वाहने तपासली असून यात 1,440 वाहने दोषी आढळून आली आहेत. तर दोषी वाहन चालकांकडून 36 लाख 6 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.
Nashik News | नाशिकच्या ‘या’ दोन जागा ठाकरे सेनेच्या वाट्याला; उमेदवारही ठरले..?
सदर गोष्टींची होते तपासणी
खाजगी प्रवासी बस तपासणी मोहिमेअंतर्गत, वेग नियंत्रकांमध्ये छेडछाड करणे, विनापरवाना, अग्निशमन यंत्रणा नसणे, परवान्याच्या अटींचा भंग करणारी वाहने, अवैधरीत्या टप्पा ववाहतूक, क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी, वाहनात बेकायदेशीर केलेले फेरबदल, अवैध मालवाहतूक करणाऱ्या बस, योग्यता प्रमाणपत्र नसणाऱ्या, आपत्कालीन निर्गमन व दरवाजे कार्यरत स्थितीत नसणाऱ्या, ज्यादा भाडे आकारणी, रिफ्लेक्टर, टेललाईट, इंडिकेटर, वायपर इत्यादींची मोटर वाहन कायद्यानुसार तपासणी करण्यात येते.
“खाजगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांनी वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक असून ही वाहन तपासणी मोहीम ही सुरू राहणार आहे. या दोष आढळल्यास कारवाई करण्यात येईल.”
– प्रदीप शिदे, प्रादेशिक परिवहन अधिकारी, नाशिक.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम