Pune News | निवडणुकीच्या धुमाळीत पुण्यात मोठी कारवाई; नाकाबंदीदरम्यान 138 कोटींचे सोने हस्तगत

0
35
#image_title

Pune News | राज्यामध्ये सर्वत्र विधानसभा निवडणुकीचे रणधुमाळी सुरू असून या निवडणुका पारदर्शक पद्धतीने पार पडाव्यात याकरिता निवडणूक आयोग सतर्क आहे. अशातच पुण्यात नाकाबंदीदरम्यान पोलिसांना 138 कोटींचे सोने सापडले आहे. पुण्यातील सहकारनगर भागात नाकाबंदी करत असताना पोलिसांनी हे सोने जप्त केले असून या संदर्भात निवडणूक अधिकारी आणि आयकर विभागाला माहिती कळविण्यात आली आहे.

Pune News | बिग हिट मीडिया प्रस्तुत ‘पैलवान’ गाण्याचा संगीत अनावरण सोहळा जल्लोषात संपन्न

15 ते 24 ऑक्टोबर पर्यंत 89 कोटी 74 लाख रुपयांची मालमत्ता जप्त

तर इतक्या मोठ्या किमतीचे सोने सापडल्याने शहरात खराब उडाली असून हे सोने कुठून आले व कुठे जात होते? याबाबत नागरिकांमध्ये चर्चा सुरू झाल्या आहेत. 2024 च्या विधानसभा निवडणुकींकरिता 15 ऑक्टोबर पासून आदर्श आचारसंहिता लागू झाली असून राज्य शासनाच्या व केंद्र शासनाच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांद्वारे करण्यात आलेल्या कारवाईत बेकायदा दारू, पैसा, ड्रग्ज, मौल्यवान धातू इत्यादी बाबतीत 15 ते 24 ऑक्टोबर 2024 पर्यंत 89 कोटी 74 लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. त्यापैकी गेल्या 24 तासांमध्ये 52 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे.

Pune News | दर्गा की पुण्येश्वर महादेव मंदिर..?; दर्ग्याच्या अतिक्रमणावरून तणाव

एका दिवसात 52 कोटींची मालमत्ता जप्त

निवडणुक आचारसंहितेच्या काळात सहजपणे कार्यरत असलेल्या महाराष्ट्रातील एकूण अंमलबजावणी यंत्रणांनी एका दिवसात 52 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्याची कामगिरी बजावली असून विविध ठिकाणी वापरलेले पोलीस विभाग आणि इतर यंत्रणांची तपासणी योग्य पद्धतीने कार्यरत असल्यामुळे हे यश मिळाले आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here