Nashik Political | कालपासून राज्यभरात विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. त्यात महायुतीकडून उमेदवारांची घोषणा करण्यात आल्यानंतर घटक पक्षांतील तीनही पक्षात काही प्रमाणावर नाराजी दिसून येत आहे. त्यामुळे अनेक इच्छुक उमेदवारांनी बंडखोरीचे अस्त्र हाती घेतले आहे.
Nashik Political | नाशिक पश्चिममध्ये भाजपला फटका; बंडखोरी अटळ?
निवडणूक लढवण्यावर दिनकर पाटील ठाम
भाजपकडून नाशिक पश्चिम मतदार संघात विद्यमान आमदार सीमा हिरे यांना पुन्हा एकदा उमेदवारी मिळाल्यामुळे विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेल्या दिनकर पाटील यांचा हिरमोड झाला होता. त्यानंतर काल त्यांनी मेळावा घेत भाजपने 11 वर्षात सातत्याने आश्वासनांवरच बोळवन केलेली असून दरवेळी पक्षाने डावलले असल्याचे बोलून दाखवले. “त्यामुळे आता मुख्यमंत्री करतो, अथवा पंतप्रधान करतो. असा शब्द जरी दिला तरी माघार घेणार नाही.” असे म्हणत यंदाची विधानसभा लढवणारच आणि जिंकणार असा निर्धार त्यांनी व्यक्त केला होता.
Nashik Political नाशिक पश्चिमचे राजकिय समीकरण बदलणार!; डॉ. अपूर्व हिरेंचा उद्धवसेनेत प्रवेश
दिनकर पाटलांचा भाजपला रामराम
यानंतर, आता दिनकर पाटील यांनी आज संध्याकाळी 7:30 वाजता मुंबईत राजगड निवासस्थानी राज ठाकरे यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत पक्षप्रवेश केला असून त्यासाठी ते कार्यकर्त्यांसह मुंबईला रवाना झाले होते. दरम्यान, दिनकर पाटील यांना पक्षप्रवेशानंतर मनसेकडून नाशिक पश्चिम मतदार संघात उमेदवारी जाहीर झाली आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम