Nashik Political नाशिक पश्चिमचे राजकिय समीकरण बदलणार!; डॉ. अपूर्व हिरेंचा उद्धवसेनेत प्रवेश

0
60
#image_title

Nashik Political | राज्यात विधानसभा निवडणुका जाहीर होताच, घडामोडींना वेग आला असून सर्वच पक्षांकडून आता उमेदवार याद्या जाहीर होऊ लागल्या आहेत. त्यात सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये तीन पक्ष एकत्र नांदत असल्याने जागावाटपावरून सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये रस्सीखेच पहायला मिळत होती. अशातच आता याद्या जाहीर झाल्यानंतर उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्या नेत्यांची लगबग सुरू झाली असून उमेदवारी मिळवण्यासाठी पक्षांतरं वाढली आहेत.

Nashik Politics | नाशिक मध्य मतदारसंघाचा तिढा सुटेना; देवयानी फरांदेंच्या अडचणींत वाढ!

अपूर्व हिरे यांनी हाती घेतली मशाल

भाजपने जाहीर केलेल्या उमेदवारी यादीमुळे नाशकात राजकीय नाट्य पाहायला मिळत होते. अशातच आता महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने उमेदवार यादी जाहीर केली असून नाशिक पश्चिम मधून सीमा हिरें विरोधात सुधाकर बडगुजर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यानंतर आता याच पार्श्वभूमीवर मोठी बातमी समोर आली असून डॉ. अपूर्व हिंरेंनी हाती मशाल घेत नाशिकची राजकिय समीकरणे बदलली आहेत.

Nashik Political | नाशिक पश्चिममध्ये भाजपला फटका; बंडखोरी अटळ?

सुधाकर बडगुजर यांना होणार फायदा

अपूर्व हिरे यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सोडचिट्टी देत हाती शिवबंधन बांधले आहे. डॉ. अपूर्व हिरे यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत आज प्रवेश केला असून या प्रवेशामुळे नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातील उद्धव सेनेची ताकद अधिक वाढणार आहे. गेल्यावेळी अपूर्व हिरेंनी पश्चिम विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवली होती. अपूर्व हिंरेंच्या पक्षप्रवेशाने आता सुधाकर बडगुजर यांना थेट फायदा होणार आहे. सुधाकर बडगुजर यांना यापूर्वीच ठाकरे गटाकडून एबी फॉर्म देण्यात आला असून नुकत्याच जाहीर झालेल्या यादीत त्यांचे उमेदवारी निश्चित झाली आहे. त्यामुळे पश्चिम विधानसभा मतदारसंघात भाजपच्या सीमा हिरेंविरुद्ध ठाकरेगटाचे सुधाकर बडगुजर असा थेट सामना पाहायला मिळणार असून यावेळी अपूर्व हिरेंची ताकद सुधाकर बडगुजरांकडे असणार आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here